Sunday, 21 May 2017
शिक्षकांचे जगणे हे विद्यार्थ्यांसाठी - शिक्षण उपसंचालक एम.के. गोंधळी
हेरले/ प्रतिनिधी (लक्ष्मण कांबरे) दि. २१/५/१७
शिक्षकांचे जगणे हे विद्यार्थ्यांसाठी असून इ . लर्निंगच्या माध्यमातून शासन शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहे.परीणामी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडविण्यासाठी शिक्षकांनी सज्ज रहावे असे आवाहन शिक्षण उपसंचालक एम.के. गोंधळी यांनी केले . ते मिणचे (हातकणंगले ) येथील छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन ( तासगांव - पेठ वडगाव रोड ) या प्रशालेत स्वाभिमानी प्राथमीक , माध्यमिक व उच्च माध्यमीक शिक्षक सेवाभावी संघाच्या पदपत्र प्रदान सोहळाव ध्येयधोरण निर्धार मेळाव्यामध्ये अध्यक्षस्थानावरून बोलत होते .
ते पुढे म्हणाले माणसाच्या जीवनात सर्वात महत्वाचा गुरु आई असून तिच्या आशिर्वादानेच माणूस मोठा होतो . शिक्षकी पेशामध्ये एक उत्तम नागरीक घडविण्याची ताकद आहे.परीणामी प्रामाणिकपणे कार्यरत राहून विद्यार्थी व संस्था यांच्या प्रगतीकडे लक्ष व शिक्षकांनी दिले पाहीजे .
शिक्षण निरीक्षक डी.एस. पोवार म्हणाले संघटना निर्माण करणे अवघड काम आहेच परंतु त्यापेक्षाही पदाधिकारी व सदस्यानी स्वतःचे चारीत्र्य, वर्तन चांगले ठेवणे गरजेचे आहे त्यामुळे संघटना बळकट होऊन शिक्षकांच्या समस्यांचे निराकरण होईल .
कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पूजनाने मान्यवरांच्या हस्ते झाली.स्वागत व प्रास्तावीकामध्ये संघटनेची ध्येये धोरणे स्पष्ट करताना संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे म्हणाले राजकारण विरहीत कोणत्याही अपेक्षेशिवाय शिक्षकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संघटना कटीबद्ध राहील .
यावेळी लेखाधिकारी अजय शिंदे , छत्रपती शिवाजी विद्यानिकेतनचे संस्थापक राजेंद्र माने यांनी मार्गदर्शन केले .सुत्रसंचालन भरत शास्त्री यांनी केले आभार पोपटराव वाकसे यांनी मानले.
कार्यक्रमास बाळासाहेब शिक्षण प्रसारक मंडळांचे कार्याअध्यक्ष विजयसिंह माने, उदयसिंह पाटी्ल ' भास्कर चंदनशिवे , जिल्हाध्यक्ष मिलींद बारवडे, लक्ष्मण कांबरे , जिल्हा कार्याध्यक्ष अभिजीत गायकवाड , कादर जमादार , फुलसिंग जाधव , जिल्हा संपर्क प्रमूख पांडूरंग पाटील, प्रा. रामदास कांबरे, प्रकाश कांबरे , सुरेश कांबरे, सलीम खतीब, दिलीप चौगुले , संतोष शेंडगे, यु.एस. पाटील, नंदकुमार कांबळे, यांच्यासह जिल्हयातील प्राथमिक . माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक -शिक्षिका शिक्षेके इत्तर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
No comments :
Post a Comment