Powered by Blogger.

Featured Posts

Sports

Games

Sunday 24 September 2017

रुकडी येथे डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांची 130 वी जयंती उत्साहात साजरी

No comments :

प्रतिनिधी  सतिश लोहार सर ... ..... ....

.22 सप्टेबर 2017 रोजी महात्मा गांधी विद्यालय रुकडी येथे डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 130 वी जयंती निमित्त कर्मवीर आण्णाच्या प्रतिमेचे पूजन करून प्रभात फेरी काढण्यात आलि यावेळी उपस्थित मा प्राचार्य शेळके सर उपमुध्यापक श्री गुळवे सर परीवेक्षक श्री जे के जाधव  माजी प्राचार्य बी जी शितोळे सर प्राथमिक विभाग चे मुख्याध्यापक श्री कुरणे सर क्रिडा शिक्षक श्री स्वप्नील पाटिल सर श्री ए व्ही पाटील सर श्री खंडागळे सर श्री शाहु संकुल डीएड् कॉलेज चे प्राध्यापक उपस्थित होते या प्रभात फेरी मध्ये विद्याथ्यानी लेझिम , झांजपथक ढोल पथक , वारकरी पथक यांचे सादरीकरण केले. विदयार्थ्यांनी आण्णा व वहिनी , छत्रपती शिवाजी महाराज ,श्री शाहु महाराज , झाशी ची राणी यांची वेशभूषा परिधान केली होती त्याच बरोबर कु सायली आंबी हिने मर्दानी खेळाचे सादरीकरण केले यासाठी तिला क्रिडा शिक्षक श्री स्वप्नील पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले .....

Saturday 23 September 2017

सर्वसामान्यांसारखा असाही मंत्री

No comments :

वेब मिडिया

महाराष्ट्राचे महसूल, मदत व पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.चंद्रकांत दादा पाटील, हे साधे सामान्यांसारखे वागतात याची प्रचीती काल छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक मुंबई येथे आली, मंत्रालयातील काम आटोपून ते कोल्हापूर ला जाण्यासाठी स्टेशनवर आले असता एक अधिकारी काम घेऊन आला. एका महत्त्वाच्या कागदपत्रावर चंद्रकांत पाटलांची सही हवी होती. यावेळी त्यांनी त्वरित
प्लॅटफॉर्मवर पडलेल्या गोणीवर बसून, सर्व पेपर वाचून काढले. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी तिथेच सह्या केल्याआणि ते कोल्हापूरसाठी रवाना झाले.
हे पाहताना मुंबईकर व सहप्रवासी थक्क झाले कि असेही मंत्री आहेत जे कोणताही रुबाब न दाखवता साधे वागतात.

फोटो गोणीवर बसून जनता जनार्दनाच्या पत्रांवर कार्यवाही करताना....
शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर, 2017.

Thursday 21 September 2017

कोल्हापूर - रत्नागिरी मार्गावर महाराष्ट्र नवंनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

No comments :

पैजारवाडी प्रतिनिधी:- कृष्णात हिरवे
बोरपाडळे (ता पन्हाळा )येथे कोल्हापूर - रत्नागिरी मार्गावर आज सकाळी ११ वा. महाराष्ट्र नवंनिर्माण वडाप वाहतूक सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.या अर्धा तासाच्या रास्ता रोको आंदोलनामुळे मार्गावर दोन्ही बाजूस वाहनांची मोठी रांग लागली होती कोडोली पोलिसांनी वेळीच आंदोलकाना ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत केली.
      आर टी ओ कार्यालयात वाहन पासिंग साठी घालण्यात आलेल्या जाचक अटी शिथिल व्हाव्यात, विमा कंपन्या कडून आकारले जाणाऱ्या प्रीमियम मध्ये सवलत मिळावी दररोज होणारी पेट्रोल डिझेल दरवाढ रोखावी या प्रमुख मागण्या साठी हे आंदोलन करण्यात आले

बोरपाडळे व कोडोली परिसरात तीन व चार चाकी वाहनातून प्रवाशी वाहतूक वडाप केले जाते प्रवाशांकडे उपलब्ध असलेली खाजगी वाहने ,बेरोजगारीमुळे व्यवसामध्ये वाढलेली स्पर्धा आणि दररोज वाढणारी इंधन दर वाढ या मुळे वडाप व्यवसाय परवडत नाही तरीसुद्धा या वडाप व्यवसायावर हजारो कुटूंब आपला चरिरार्थ कसाबसा चालवत आहेत आणखीन त्यात भरीतभर म्हणून विमा कंपण्याकडून दर वर्षी होणारी प्रीमियममध्ये मोठी वाढ  व आर.टी. ओ. कार्यालयात वाहन पासिंग दरम्यान जाचक अटी लावल्याने वाहन परवाना रद्द होऊन वडाप व्यवसायकावर उपासमारीची व शेतकऱ्या प्रमाणे आत्माहात्या करण्याची वेळ आली आहे या वरील बाबी वडाप व्यवसायीकाला न परवडणाऱ्या आहेत त्यामुळे व्यवसायिक त्रस्त आहे याचा निषेध करण्यासाठी व वडाप व्यवसायीकला आपला हक्क मिळण्याकरीता सरकार विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास भाग पडल आहे असे म.न.से.जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांनी आंदोलकांच्या वतीने सांगतले
आंदोलकांनी बोरपाडळे हॅाटेल येथे कोल्हापूर - रत्नागिरी मार्ग आडून रस्ता रोको आंदोलन केले यावेळी आंदोलकांनी सरकार विरोधात घोषणा देऊन आपला आपला संताप व्यक्त केला
आर टी ओ कार्यालयात वाहन पासिंग साठी घालण्यात आलेल्या जाचक अटी शिथिल व्हाव्यात, विमा कंपन्या कडून आकारले जाणाऱ्या प्रीमियम मध्ये सवलत मिळावी दररोज होणारी पेट्रोल डिझेल दरवाढ रोखवी रद्द झालेले वाहन परवानेया परत मिळावीत असा प्रमुख मागण्या साठी आंदोलन करण्यात आले या सर्व मागण्यावर सरकारने
विचार नाही केल्यास या हि पेक्षा राज्यव्यापी तीव्र आंदोलन करणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले
साधारण अर्धा तास चाललेल्या या आंदोलनात म.न.से.जिल्हाध्यक्ष राजू जाधव,उपाध्यक्ष आण्णा तिळवे,महिला आघाडी उपाध्यक्षा श्रद्धा महागावकर,विनायक शहराध्यक्ष नयन गायकवाड,पाटील नरेश चिकोडीकर अमित पाटील श्रीकांत वंदुरे,अमोल पाटील,शिवाजी मगदूम,विनायक पवार,फिरोज मुल्ला,यशवंत साठे, काकासाहेब महापुरे,सरदार जंगम,सचिन लोकरे,सुरेश निकम,बाबासो मोरे,राजू मुल्ला,जहागीर मुल्ला,सिरीज कुंभार, अमर कांबळे,जितेंद्र समुद्र,रघुनाथ पाटील,इ वडाप सेनेचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते या सर्व आंदोलकाना पोलिसांनी कारवाही  साठी ताब्यात घेतले आहे.

राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणा द्वारे समाज क्रांती घडवून आणली --अजितकुमार पाटील

No comments :

कोल्हापूर प्रतिनिधी

   कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिसरातील इ.स.१८७१ ची स्थापना असणाऱ्या मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिरमध्ये
* *राजर्षी शाहू शिक्षण क्रांती दिन* उत्साहात संपन्न झाला..
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.अजितकुमार पाटील,व श्री.रुद्र पाटील,यांच्या हस्ते राजर्षी शाहूंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या निमित्त शाळेमध्ये लहान गट व मोठा गटात निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,यांचे शाहू शिक्षण क्रांती सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले होते.स्वागत संदिप वाघमारे यांनी केले,तर प्रास्तविक व शाहू शिक्षण क्रांती दिनाची माहिती मुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांनी दिली.आपल्या मनोगत मध्ये,राजर्षी शाहू महाराज यांनी समाजातील सर्व लोकांचा अभ्यास करून अज्ञान व निरक्षरता नष्ट करायची असेल तर समाजातील प्रत्येक व्यक्ती शिकली पाहिजे,सुसंस्कृत झाली पाहिजे याचा ठाम असा विश्वास राजर्षी शाहू महाराजांना होता.म्हणून 21 सप्टेंबर 1917 या दिवशी मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा केला."शिक्षणास योग्य वयाची मुले शाळेत पाठवण्याची आई वडिलांना सक्ती करण्यात आली होती.मुले शाळेत पाठवली नाहीत ,तर त्यांना प्रत्येकी महिन्याला एक रुपया दंड करण्याची तरतूद करण्यात आली होती."यासाठी एक शिक्षण तज्ञांची  समिती नेमून एक लाख रुपये खर्च करण्याचे जाहीर केले होते.अश्या प्रकारे शाहू महाराजांनी शिक्षणात समाज क्रांती घडवून आणली.असे प्रतिपादन मुख्याद्यापक अजितकुमार पाटील यांनी केले.यावेळी श्रावणी पाटील, समीक्षा जामदार,शाहिद करजगे, अनुप पाटोळे,मयुरी कांबळे,निषिका शिंदे,श्रुती चौगले,या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली.
या प्रसंगी भारतवीर मित्र मंडळाचे अध्यक्ष चेतन चौगले ,जेष्ठ शिक्षक उत्तम कुंभार,सुशील जाधव, सुजाता आवटी , प्राजक्ता कुलकर्णी,अरुण सुनगार,शिवशंभू गाटे,आसमा तांबोळी , बालवाडी शिक्षिका कल्पना पाटील मॅडम,गायत्री प्रभावळे मॅडम, सेवक हेमंतकुमार  पाटोळे ,मंगल मोरे तसेच  भागातील पालक,जेष्ठ नागरिक ,सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित.
कार्यक्रमाचे आभार समीक्षा पाटील हिने मानले.

विज्ञान नाटयोत्सव इचलकरंजीचे राजवाडा हायस्कुल अजिंक्य

No comments :

प्रतिनिधी सतिश लोहार
         

यशवंतराव चव्हाण पॉलीटेक्निक इचलकरंजी येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवात इचलकरंजी हायस्कुल (राजवाडा) या संघाने प्रथम क्रमांक मिळवला. उषाराजे हायस्कुल, कोल्हापूरचा संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. या दोन संघांची कोल्हापूर विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.

अत्यन्त उत्साही वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेत एकूण सात संघ सहभागी झाले होते. विद्यार्थी कलाकारांनी उत्कृष्ट कला सादर केल्यामुळे स्पर्धेत चुरस वाढली होती. राजवाडा हायस्कुलच्या संघाने उत्कृष्ट सादरीकरण करून अजिक्यपद खेचून घेतले.

प्रारंभी यशवंतराव चव्हाण पॉलीटेक्निक, इचलकरंजी चे प्राचार्य मा. ए. पी. कोथळी यांच्या शुभहस्ते स्पर्धेचे उदघाटन झाले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सेवानिवृत्त कला शिक्षक श्री. ए. ए.  पाटील, श्री. जे. जी. कुलकर्णी यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वी संयोजनामध्ये सौ. उपाध्ये मॅडम, श्री. पी. बी. करुणा, श्री पी. बी. गुळवणी, श्री. पी. व्ही. कांबळे, श्री. अमित जाधव, शाहरुख बारगीर यांनी मोलाचे सहकार्य केले. जिल्हा विज्ञान समन्वयक श्री. सागर चुडाप्पा आणि श्री. श्रीशैल मठपती यांनी स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले.

मा. शिक्षणाधिकारी किरण लोहार  आणि जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक मा.आकुर्डेकर यांनी यशस्वी संघाचे हार्दिक अभिनंदन केले तसेच सर्व सहभागी बाल कलाकारांना शुभेच्छा दिल्या.....

मुख्याध्यापक संघाच्या जिल्हास्तरीय नाटयछटा स्पर्धत कु. प्रथमेश पाटील व शिक्षक जनार्दन पाटील प्रथम

No comments :

हेर्ले/ वार्ताहर दि. २१/९/१७            मुख्याध्यापक संघाच्या जिल्हास्तरीय नाटयछटा स्पर्धत  कु. प्रथमेश पाटील व शिक्षक जनार्दन पाटील यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक  पटकावित घवघवित यश मिळविले                                                मुख्याध्यापक संघ कोल्हापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या नाट्यछटा स्पधेत श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाचे गुणवंत  कु प्रथमेश भगवान पाटील  नाट्यछटा सादरीकरण मुलांचा गट- जिल्ह्यात प्रथम  तर या नाट्यछटा लेखनात व दिग्दर्शनात अध्यापक  जनार्दन पाटील प्रथम आले . तसेच मुलींच्या गटात कु रश्मी राजेश नाईकवाडे जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटका विला. तसेच या नाट्यछटा  यशस्वितांना  मुख्याध्यापक -डी.व्ही पाटील शिक्षकवृंद तसेच श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व सर्व संचालक यांचे मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली .

Monday 18 September 2017

कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मा.मदन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्त दान शिबिराचे आयोजन

No comments :

कोल्हापूर प्रतिनिधी

कोल्हापूर येथील केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेचे सहसचिव व जिल्हाध्यक्ष मा. मदन पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्त दान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघटनेच्या बहुसंख्य सभासदांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले. तसेच रक्त व चरबी तपासणी करण्यात आली. रक्त दान शिबिराचे नियोजन अर्पण ब्लड बैंक कोल्हापूर यांच्या समन्वयाने करण्यात आले होते.
       या प्रसंगी मा. मदन पाटील साहेब यांना सर्व उपस्थितांनी भरभरून शुभेच्छा दिल्या व जिल्हा आणि राज्य स्तरावर आपली उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशा शुभकामना व्यक्त केल्या.