Monday, 18 September 2017
कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मा.मदन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्त दान शिबिराचे आयोजन
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर येथील केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेचे सहसचिव व जिल्हाध्यक्ष मा. मदन पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्त दान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघटनेच्या बहुसंख्य सभासदांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले. तसेच रक्त व चरबी तपासणी करण्यात आली. रक्त दान शिबिराचे नियोजन अर्पण ब्लड बैंक कोल्हापूर यांच्या समन्वयाने करण्यात आले होते.
या प्रसंगी मा. मदन पाटील साहेब यांना सर्व उपस्थितांनी भरभरून शुभेच्छा दिल्या व जिल्हा आणि राज्य स्तरावर आपली उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशा शुभकामना व्यक्त केल्या.
No related posts
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment