Powered by Blogger.

Monday 18 September 2017

हेरले श्री छ.शिवाजी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मा. सभापती राजेश पाटील यांची आघाडी विजयी

No comments :

हेर्ले/ वार्ताहर दि. १७/९/१७

   हातकणंगले तालूक्यातील हेरले येथील श्री छत्रपती शिवाजी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये माजी सभापती राजेश पाटील यांच्या आघाडीने दहा जागा जिंकून सत्ता प्रस्थापित केली.
         श्री छत्रपती शिवाजी विकास सेवा संस्थेची एकूण मतदान४१४ पैकी ३९४ झाले,१३ सदस्यासाठी निवडणूक पार पडली. कामधेनू समुह नेते आदगोडा पाटील यांची श्री छत्रपती शिवाजी स्वाभिमानी विकास पॅनेल विरूध्द माजी सभापती राजेश पाटील यांच्या श्री छत्रपती शिवाजी स्वाभिमानी आघाडीमध्ये काटा लढत झाली. यामध्ये राजेश पाटील यांनी दहा जागा जिंकून सत्ता काबीज केली.
      राजेश पाटील यांच्या पॅनेलचे विजयी उमेदवार सर्व साधारण खातेदार कर्जदार राजेश शांतगोंडा पाटील ( २११) सुनिल आण्णासो खोचगे ( १९२ ) उदय भुपाल चौगुले( १८७) शशिकांत आदगोंडा पाटील (१८८) कपिल नामदेव भोसले( १८५)
महिला राखीव शांतादेवी बाळासो कोळेकर( २१३) रोहीणी रमेश पाटील( १९४) अनुसुचित जाती राजेंद्र शामराव कदम ( १९४) इतर मा. प्रवर्ग अशोक बाळासो मुंडे( २o३) विमुक्त जाती स्वप्निल बाळासो कोळेकर ( २१०) आदी दहा सदस्य विजयी झाले.
    आदगोंडा पाटील यांच्या पॅनेलचे तीन विजयी उमेदवार सर्व साधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी  आदगोंडा बाबगोंडा पाटील( २०५) प्रकाश बाबगोंडा पाटील (२०३) महावीर बाळासो चौगुले(१८५)
  निवडणूक निर्णय अधिकारी मकसुद शिंदी यांनी काम पाहिले तर सहाय्यक म्हणून सुनिल चंदगडकर, संजय झलग, बंडोपंत महाडीक, पावलस कांबळे, महादेव शिंदे यांनी काम पाहिले. श्री छत्रपती शिवाजी स्वाभिमानी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतीषबाजी करीत आणि गुलालाची उधळण करून आनंद व्यक्त केला.
                  
     सुज्ञ मतदारांना पाटील बंधू व कोळेकर माय लेकरांना विजयी केले.
  आदगोंडा पाटील व त्यांचे बंधू प्रकाश पाटील यांनी पंधरा वर्षे संस्था चालविली हे एका पॅनेल मधून उभे होते. तर संस्थापक अध्यक्ष कै. बाळासाहेब कोळेकर यांच्या पत्नी शांतादेवी कोळेकर व त्यांचा मुलगा स्वप्नील कोळेकर दूसऱ्या पॅनेलमधून उभे होते. मतदारांनी या चौघांनाही विजयी करून संस्थापकांची आणि संस्थाचालकांची कृतज्ञता व्यक्त केली.

No comments :

Post a Comment