Thursday, 21 September 2017
विज्ञान नाटयोत्सव इचलकरंजीचे राजवाडा हायस्कुल अजिंक्य
प्रतिनिधी सतिश लोहार
यशवंतराव चव्हाण पॉलीटेक्निक इचलकरंजी येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवात इचलकरंजी हायस्कुल (राजवाडा) या संघाने प्रथम क्रमांक मिळवला. उषाराजे हायस्कुल, कोल्हापूरचा संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. या दोन संघांची कोल्हापूर विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
अत्यन्त उत्साही वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेत एकूण सात संघ सहभागी झाले होते. विद्यार्थी कलाकारांनी उत्कृष्ट कला सादर केल्यामुळे स्पर्धेत चुरस वाढली होती. राजवाडा हायस्कुलच्या संघाने उत्कृष्ट सादरीकरण करून अजिक्यपद खेचून घेतले.
प्रारंभी यशवंतराव चव्हाण पॉलीटेक्निक, इचलकरंजी चे प्राचार्य मा. ए. पी. कोथळी यांच्या शुभहस्ते स्पर्धेचे उदघाटन झाले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सेवानिवृत्त कला शिक्षक श्री. ए. ए. पाटील, श्री. जे. जी. कुलकर्णी यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वी संयोजनामध्ये सौ. उपाध्ये मॅडम, श्री. पी. बी. करुणा, श्री पी. बी. गुळवणी, श्री. पी. व्ही. कांबळे, श्री. अमित जाधव, शाहरुख बारगीर यांनी मोलाचे सहकार्य केले. जिल्हा विज्ञान समन्वयक श्री. सागर चुडाप्पा आणि श्री. श्रीशैल मठपती यांनी स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले.
मा. शिक्षणाधिकारी किरण लोहार आणि जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक मा.आकुर्डेकर यांनी यशस्वी संघाचे हार्दिक अभिनंदन केले तसेच सर्व सहभागी बाल कलाकारांना शुभेच्छा दिल्या.....
No comments :
Post a Comment