Sunday, 4 June 2017
मौजे वडगांव प्रिमीअर लिग क्रिकेट स्पर्धेत भिमा ट्रेडर्स संघ विजेता
मौजे वडगांव .
हेरले / प्रतिनिधी : दि.४/६/१७
मौजेवडगांव ( ता. हातकणंगले ) येथे आयोजीत केलेल्या मौजे वडगांव प्रिमीअर लिग क्रिकेट स्पर्धेत भिमा ट्रेडर्स संघाने प्रथम क्रमांक पटकाविला
दहा संघानी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. आय पी एल क्रिकेट प्रमाणे दहा संघ मालकानी दहा संघ प्रत्येकी आकरा खेळाडू खरेदी करून निवडले सलग तीन दिवस स्पर्धा रात्री खेळविल्या गेल्या. अंतिम सामन्यात भिमा ट्रेडर्सने अविनाश टायगर्स यांच्या वर विजय मिळवित प्रथम क्रमांक पटकाविला तर तृतीय क्रमांक सरपंच ग्रुप व सी .एस. सुपर किंग यांना विभागून देण्यात आला. अंतिम सामन्याचे उद्घाटन धनाजी व विठ्ठल सावंत यांच्या हस्ते झाले. सरपंच सतीश चौगुले यांनी नाणेफेक करून स्पर्धेस सुरुवात झाली.
या प्रसंगी पि .के.पॉलीटीक्सच्या वतीने आयोजकांचा सत्कार प्रकाश कांबरे, सचिन लोहार, शुभम जाधव , पवन जाधव, भूपाल कांबळे, महादेव शिदे ,व त्यांच्या सहकाऱ्या मार्फत करण्यात आला. स्पर्धक विजेते यांना अनुक्रमे ५००० चषक, ३००० चषक, २००० चषक बक्षिस प्रदान करण्यात आली. यावेळी प्रविण पाटील, राकेश सावंत,योगेश चौगुले, मोहसीन बारगीर, विशाल, अतुल अकिवाटे, डॉ . प्रविण पाटील, डॉ . सुतार, नदिम हजारी प्रशांत पाटील, राजवीर डोरले, भोसले अनंत जाधव, गौस हजारी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्तविक सुशांत खारेपाटणे यांनी केले तर आभार महादेव चौगुले यांनी मानले.
फोटो - मौजे वडगांव येथील क्रिकेट स्पर्धेतील विजेते संघासोबत भावेश पटेल, सुशांत खारेपाटणे, प्रदीप रजपूत
( छाया प्रकाश कांबरे)
No comments :
Post a Comment