Powered by Blogger.

Saturday, 11 February 2017

चांगभलंच्या गजरात रविवार दि १२ पासून जोतिबाचे खेटे सुरू

No comments :

प्रतिनिधि - अतिश लादे , जोतिबा

सकलजनांसह  महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशसह देशभरातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान व आराध्य दैवत अशी दख्खनच्या जोतिबाची ओळख आहे. कुलधर्म पौर्णिमेनंतर येणारया पाच रविवारांना  भाविक सलग पायी यात्रा करतात म्हणुन या पाच रविवारांना जोतिबाचे खेटे म्हणून ओळखले जाते
जोतिबाचे खेटे रविवारपासून (ता. १२ फेब्रुवारी) सुरू होत असून यानिमित्त लाखो भाविक वाडी रत्नागिरी येथे जोतिबा देवाच्या दर्शनासाठी येणार आहेत
याप्रसंगी अनेक भक्त , संस्था , मंडळे यथाशक्ती चहा , दुध , प्रसाद व महाप्रसाद वाटप करून यात्रेकरुंची सोय करतात
तसेच सायंकाळी पालखी सोहळा संपन्न होऊन फटाक्यांच्या आतिशबाजीत खेट्याची सांगता होते

No comments :

Post a Comment