Saturday, 11 February 2017
कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकात संतप्त प्रवाशांचा अचानक रास्तारोको
प्रतिनिधी सतिश लोहार
दि १० शुक्रवार .
कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकात इचलकरंजीला बस न सोडल्याने प्रवाश्यांनी अचानक गेटसमोर उभे राहुन रस्ता अडवला , संध्याकाळी नेहमीच इचलकरंजी च्या प्रवाशांना कोल्हापूर बसस्थानकावर एसटीची ताटकळत वाट पहावी लागते , दररोज नोकरी निमीत्त ये जा करणारे खूप आहेत, ते नेहमी बसमधून उभारूनच प्रवास करतात , चुकीचे व अकार्यक्षम व्यवस्थापनामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होतात ,
तिकीट काढुनही उभा राहुन दररोज प्रवास करावा लागतो , आज प्रवासी वर्गाचा उद्रेक झाला ते संतापून आक्रमक झाले त्यानी जवळ जवळ तासभर रास्ता रोको करत स्थानकातुन बाहेर पडणार्या सर्व बसेसचा मार्ग अडवला , त्यांनंतर खडबडुन जागे झालेल्य व्यवस्थापनाने नमते घेत कोल्हापूर ते इचलकरंजी मार्गावर एकापाठोपाठ एक चार गाड्या सोडल्या
दररोज प्रवासी असा अन्याय सहन करतात , एसटी व्यवस्थापनाबद्दल यावेळी प्रवासीवर्गातुन मोठी नाराजी दिसली . नेहमीच् एका गाडीत दोन गाडीचे प्रवासी असतात , संध्याकाळी नेहमीच इचलकरंजीला जाणार्या प्रवाशांना कोल्हापूर बसस्थानकावर एसटीची ताटकळत वाट पहावी लागते , दररोज नोकरी निमीत्त ये जा करणारे खूप प्रवाशी आहेत, ते नेहमी बसमधून उभारून च प्रवास करतात , चुकीच्या फेरी व्यवस्थापनामुळे प्रवाशांचे विशेषत: नोकरदार महिलांचे अतोनात हाल होतात , तिकीट काढुनही उभा राहुन दररोज प्रवास करावा लागतो ,
, ज्या मार्गावर चांगले भारमान आहे त्या मार्गावर योग्य सेवा पुरवणे अपेक्षित असताना नेहमीच् एका गाडीत दोन गाडीचे प्रवासी असतात , त्यामानाने गाडीची अवस्था खूपच वाईट असते
महाराष्ट्राच्या एसटी बसची तुलना कर्नाटक बस बरोबर केली असता एसटी बसची दुरवस्था प्रकर्षाने जाणवते
No comments :
Post a Comment