Powered by Blogger.

Saturday, 11 February 2017

बीजेपी सरकार धनदांडग्यांचे - हसन मुश्रीफ

No comments :

प्रतिनिधि - समीर कटके

  केंद्र व राज्यातील बीजेपी सरकार धनदांडग्यांचे आहे.गोरगरीब निराधारांच्या योजना बंद करून त्यांना देशोधडीला लावायचे हा एकच कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे. तालुक्यातील संजय गांधी निराधार समितीने अडीच हजार वंचितांच्या पेन्शन बंद करून त्यांच्या चुलीत पाणी ओतायचे पाप केले आहे. गोरगरिबांच्या पोटावर मारून आपलं पोट चालवणाऱ्या , राजकारणाचा धंदा करणाऱ्या लोकांच्या चुलीत पाणी ओतून त्यांचा धंदा बंद करण्याचा निर्णय तालुक्यातील जनतेने घेतला आहे अशी टिका माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी केली
         शिंदेवाडी ता कागल येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. जेष्ठ नागरिक मारुतीराव शिंदे अध्यक्षस्थानी होते.
         आम मुश्रीफ म्हणाले गेल्या पंचवीस वर्षात पंचायत समितीची सत्ता अखंडपणे ताब्यात ठेवणाऱ्या संजय घाटगे यांनी कोणतं काम केले ? एक तरी योजना लोक पर्यंत आणली का? असा सवाल त्यानी केला. आमदारकी व मंत्रीपदासाठी मला भरभरून आशीर्वाद देणारया तालुक्यातील जनतेने पंचायत समितीची जबाबदारी माझ्याकडे द्यावी समिती गोरगरिबांच्या व उंबऱ्यापर्यंत आणून दाखवतो. येत्या काळात बेरोजगारी कमी करण्यासाठी कागल एमआयडीसी मध्ये मोठा प्रकल्प उभा करणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
      प्रविणसिंह पाटील म्हणाले मुरगुड नगरपालिकेत मुश्रीफांच्या आशीर्वादाने कोट्यवधींची विकासकामे केली तरी पराभव झाला. मी लढणारा कार्यकर्ता आहे पराभवाने खचून न जाता मी पुन्हा उभा राहिलो. विश्वानाथराव पाटील घराण्याला कधीही पराभवाचा कलंक लागला नव्हता. पण हे घडले . पराभवाच्या मूळ कारणांना बगल देऊन स्वतःची सुटका करून घेण्यासाठी काहींनी पराभवाचे खापर मुश्रीफ गटावर फोडण्याचे षडयंत्र केले व भाजप मध्ये जाण्याचा घाट घातला पण मी व कार्यकर्त्यांनी याला ठाम विरोध केला . पाटील गटाचे 85 टक्के कार्यकर्ते आपल्यासोबत असून जेष्ठ बंधू दिलीपसिंह व अजितसिंह पाटील यांचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे . आमचे कार्यकर्ते भक्कम पणे राष्ट्रवादीच्या उमेदवारांसोबत ठाम उभा राहील असेही ते म्हणाले.
यावेळी पं स चे उमेदवार निलेश शिंदे, जिप  उमेदवार अर्चना पाटील, विकास पाटील, यांची भाषणे झाली. स्वागत ऍड जीवनराव शिंदे यांनी केले, प्रास्तविक वसंतराव शिंदे यांनी केले. या सभेस दलीतमित्र डी डी चौगले , रंगराव पाटील, शामराव पाटील, दिग्विजय पाटील, रामचंद्र कदम, रणजित सूर्यवंशी, रवींद्र शिंदे, जयवंत पाटील, दत्तात्रय गिरी, नाना जाधव आदी उपस्थित होते.

शरद पवारांसारखा नेता महाराष्ट्रात जन्मला नसता तर शेतकरी देशोधडीला लागला असता लोकांनी मोदींच्या भाषणाच्या भुलभुलैय्यास बळी पडू नये. काळम्मावाडी पाटगाव सारखे प्रकल्प भाजप मोदीनी नव्हे तर काँग्रेसच्या काळात झाले हे लक्षात ठेवले पाहिजे. सहकाराची उभारणी काँग्रेसने केली त्याची जाण ठेवून सेना भाजपच्या मूठभर धनिकांच्या सत्तेला ठोकर मारून राष्ट्रवादी काँग्रेसला विजयी करावे असे आवाहन प्रविणसिंह पाटील यांनी केले.

No comments :

Post a Comment