Saturday, 11 February 2017
तरुणांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल
प्रतिनिधि - ज्ञानराज पाटील
सध्याच्या इलेक्शन फिवरमध्ये वाहवत जाणार्या तरुणाईच्या डोळ्यात चांगलं झणझणीत अंजन घालणारी ही पोस्ट सोशल मिडीयावर फारच व्हायरल झाली आहे ,
मनसे /राष्ट्रवादी / कॉँग्रेस /भा ज पा / शिवसेना पक्षात गेलेल्या
तरुण बिनडोक तरुणांनो
राज ठाकरे बोलला लगेच गेला टोलनाका अड्वायला
उद्धव ठाकरे बोलला चालला मराठी म्हणून बस फोडायला
शरद पवार बोलले लागला पुरंदरेला शिव्या द्यायला
बी जे पी वाला बोलला चालला गो माता गो माता करायला
राहुल गांधी बोलला लागला रस्त्यांवर पळायला
ह्यांची मुले स्टडी रूममध्ये
तुम्ही कस्टडी रूममध्ये
ह्यांची मुले अमेरीका युरोपात
तु दहीहंडीच्या कळपात
ह्यांची मुले उच्चपदस्थ
तू एका क्वॉर्टर एवढा स्वस्त
त्यांची मुले इंजिनियर
तू पितो किंगफिशर बीअर
त्यांच्या मुलांना पाचआकडी पगार
तु हंगामी बेरोजगार
नको पवार नको ठाकरे नको मोदी नको सोनिया
तुम्ही मेलात तरी कोणाला फरक पडत नाहीत.
जगा फक्त तुमच्या आई-बापा साठी, समाजासाठी, आणि स्वत: साठी.
तरूणांना तसेच प्रत्येक व्यक्तीलाच विचार करायला लावणारी ही पोस्ट आहे , कारण प्रत्येक राजकारणी आपल्या वारसदारालाच राजकारणात पुढे आणत असतो व सर्व सामान्य कार्यकर्त्याच्या हातात फक्त खळ आणि पोस्टरच उरते !
No comments :
Post a Comment