Powered by Blogger.

Wednesday, 15 February 2017

सरकारी काम आणि कित्येक वर्ष थांब

No comments :
   
 प्रतिनिधी - सतीश पाटील , वडणगे                

सरकारी काम आणि कित्येक वर्ष थांब असाच काहीसा अनुभव कोल्हापुरात पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाच्या बाबतीत अनुभवास येत आहे . खुद्द सार्वजिनक बांधकाम मंत्री पद कोल्हापूर जिल्ह्याला लाभलेले असूनही त्याचा काडीमात्र उपयोग होत नसल्याचे जाणवत आहे कारण महाड पूल दुर्घटना मागील वर्षी पावसाळ्यात घडल्यानंतर राज्यातील सर्व जुन्या पुलांचे ऑडिट करू व जीर्ण पूल वाहतुकीस बंद करून नवीन पर्यायी पूल १८० दिवसात उभारू अश्या पोकळ घोषणा मंत्री व सरकारकडून केल्या गेल्या , कदाचित सरकारला आपण काल काय बोललो हे आज आठवत नसावे , शिवाजी पुलाच्या बाबतीतही असेच काहीसे घडत आहे कारण ब्रिटिश कंपनीने या पुलावरील वाहतुकीला कधीच लाल कंदील दाखवला आहे हे माहित असूनही सरकारचा भोंगळ कारभार कधीतरी कोल्हापूरवासियांच्या जीवावर बेतणार हे नक्की !

            महाड दुर्घटनेनंतर त्वरित पुलाचे अपूर्ण काम पूर्ण करून नवीन पर्यायी पूल ताबडतोब वाहतुकीस खुला करू असे सरकारने त्यावेळी जाहीर केले होते आता ३ महिन्यांनी परत दुसरा पावसाळा सुरु होत आहे पण कार्यवाही शून्य !
            म्हणजेच बोलाचा भात आणि बोलाची कढी हे सरकारचे ब्रीदवाक्य आहे काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे !

No comments :

Post a Comment