Powered by Blogger.

Wednesday, 15 February 2017

इचलकरंजी-निपाणी रोडवर तब्बल तीन तास ट्राफिक जाम , पोलीस यंत्रणा बेफिकीर

No comments :


प्रतिनिधि - सतीश लोहार

इचलकरंजी ते निपाणी रोडवर रोजच सायंकाळी वाहतुकीची कोंडी होत असते , काल संकष्टी असल्याने याच रस्त्यावरील गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली आणि मग वाहतुकीचा बोजावाराच उडाला , साध्या अर्ध्या किमी अंतरासाठी २ते ३ तास वेळ लागत होता , वाहतुक नियंत्रणासाठी पोलीसांनी दुर्लक्ष केल्याबद्दल पादचारी व वाहनचालकांमधुन प्रचंड संताप व्यक्त होत होता , वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी असणार्या ट्राफिक विभागालाच आता शिस्त लावण्याची गरज असल्याचे लोक बोलत होते
  संकष्टीला भाविकांची गर्दी होणार हे माहित असुनही कोणतीही खबरदारी न घेतल्याने अशा बेफिकीर व कर्तव्यात कसुर करणार्या वाहतुक नियंत्रण पोलीसांना वरिष्ठ याचा जाब विचारणार की त्यांची पाठराखणच करणार अशी विचारणा सुजाण नागरिकांतुन होत आहे

No comments :

Post a Comment