Tuesday, 14 February 2017
जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केविलवाणा -संजय मंडलिक.
मुरगूड प्रतिनिधी
समीर कटके
आमदार मुश्रीफ हे माझ्या व संजय घाटगे यांच्या एकीबद्दल सतत बोलतात.संभ्रम निर्माण करण्याचा
केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत. पण त्यांचा हा हेतू जनता यशस्वी होऊ देणार नाही
हे ध्यानात ठेवावे.आमच्या एकीबद्दल तुम्ही चिंता करू नका.असा सल्ला प्रा.संजय मंडलिक यांनी दिला.
सुरुपली (ता.कागल) येथे आयोजित प्रचार बैठकीत ते बोलत होते.माजी आमदार संजय
घाटगे,आर.डी.पाटील,रामदास पाटील,धनाजी गोधडे आदी प्रमुख उपस्थीत होते.
श्री.मंडलिक म्हणाले,वय 18 पूर्ण नसताना देखील आपल्या मुलाला सिद्धीनेर्ली जि.प.ची उमेदवारी दिली
व पुन्हा सेनापती कापशी मतदार संघातून गेल्यावेळी निवडणुकीत नविद मुश्रीफ यांना उमेवारी देणाऱ्या
हसन मुश्रीफ यांनी पुत्र प्रेमाची भाषा करू नये.
संजय घाटगे म्हणाले,आमदार मुश्रीफ हे लोककल्याणाची कामे करण्यापेक्षा स्वकल्याणाची कामे
करण्यात गुंतले आहेत.या निवडणूकित त्यांचा धुव्वा उडवल्याशिवाय राहणार नाही.जनतेला कोणीही
गृहीत धरू नये.मुश्रीफ यांना संवेदनाच राहिल्या नाहीत.
स्वागत व्ही. बी.खंदारे यांनी,प्रास्ताविक एस.आर.बाईत यांनी केले.
सभेस उमेदवार शिवानी भोसले,युवराज लाटकर,गुरुदेव सुर्यवंशी,मोहन घस्ते, ज्ञानदेव मोरे आदी
उपस्थीत होते.
-- -- -- -
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)


No comments :
Post a Comment