Powered by Blogger.

Tuesday, 14 February 2017

काठमांडू येथील आंतराष्ट्रीय कराटे स्पर्धेत मुरगुडच्या पूजा व शुभम यांची सुवर्णपदकाला गवसणी

No comments :
मुरगुड प्रतिनिधी

समीर कटके

शि प्र मंडळ कोल्हापूर संचालित मुरगुड विद्यालय ज्यु कॉलेज मधील पूजा पुंडलिक कोळेकर व शुभम

महादेव खाटांगळे यांनी नेपाळ येथे पार पडलेल्या सातव्या आंतराष्ट्रीय कराटे स्पर्धेत तायक्वांदो क्रीडा

प्रकारात सुवर्ण पदक पटकावून घवघवीत यश संपादन केले.दि 7 ते 10 फेब्रुवारी दरम्यान संपन्न

झालेल्या या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना विविध देशातील स्पर्धकांशी लढत देताना उत्कृष्ठ

खेळाचे प्रदर्शन केले.

नेपाळ गोजे-रु कराटे स्पोर्ट्स दो असोसिएशनच्या वतीने राजधानी काठमांडू येथे या जागतिक स्पर्धांचे

आयोजन करण्यात आले होते. पूजा व शुभम यांनी चिवट झुंज दिली. पूजाने
अंतिम लढतीत नेपाळच्या

खेळाडूचा पराभव केला, त्यापूर्वी तीने विविध चार लढतीत जपान, चीन, नेपाळ व भूतानच्या खेळाडूंना

नमवले. शुभमने
अंतिम लढतीत जपानच्या खेळाडूचा पराभव केला व त्या लढतीपूर्वी त्याने नेपाळ,

चीन व भूतानच्या खेळाडूंना नमवले.

तत्पूर्वी कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धा व नोव्हेंबर व डिसेंम्बर महिन्यात

गोवा येथे झालेल्या सातव्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत दोघांनीही अजिंक्यपद मिळवले होते. त्यांच्या या

यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. एशियन ऑलिम्पिक तायक्वांदो स्पर्धेसाठी पात्रता स्पर्धा थायलंड

येथे मे महिन्यात होणार आहे . या स्पर्धेसाठी पूजा व शुभम यांची निवड झाली आहे.


खेळाडूंना क्रीडाशिक्षक व्ही जी गडकरी, मार्शल आर्ट प्रशिक्षक महेश पोवार यांचे मार्गदर्शन व प्राचार्य पी

व्ही शिंदे, उच्च माध्यमिकचे उपप्राचार्य एस पी पाटील, उपमुख्याध्यापक जे डी पाटील, एस आर पाटील,

पी बी लोकरे, संस्था सचिव प्रा .जयकुमार देसाई, पदाधिकारी शिवानीताई देसाई , शिवाजीराव सावंत,

दौलतराव देसाई, सौ मंजिरीताई देसाई-मोरे, बाळ डेळेकर यांचे प्रोत्साहन लाभले.


No comments :

Post a Comment