Tuesday, 14 February 2017
"कोणता झेंडा घेऊ हाती ?" रूकडी जि.प.मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांपुढे गहन प्रश्न !
लक्ष्मण कांबरे
हेरले/प्रतिनिधी दि.१३/२/१७
रुकडी जिल्हा परिषद मतदार संघामध्ये गटनेते प्रचार यंत्रनेमध्ये सक्रिय झालेने चुरस वाढली असून गत निवडणूकीतील मित्र विरोधात व सद्याचे विरोधातील बनले मित्र अशी स्थिती निर्माण झालेने या निवडणूकीमध्ये मतदारांना सत्वपरीक्षेस सामोरे जावे लागत आहे.
रूकडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये युवक क्रांती आघाडीतून वेदांतिका धैर्यशील माने
लढत आहेत,
राष्ट्रीय काँग्रेसमधून प्रमोदिनी भगवान जाधव,
तर स्वाभिमानी शेतकरी संघटना शिवसेना पुरूस्कृत डॉ.पदमाराणी राजेश पाटील
लढत आहेत.
रूकडी गावांमध्ये तेरा हजार पाचशे मतदान आहे. ग्रामपंचायतची अकरा सदस्य असलेने सत्ता धैर्यशील माने यांच्यागटाकडे असून त्यांचे पारडे जड आहे.तर भगवान जाधव यांच्यागटाचे सहा ग्रामपंचायत सदस्य असलेने गावांमध्ये हा गट तूल्यबळ आहे.शिवसेनेचे पिंटू मुरुमकर पं.सं.उमेदवार असून व शेतकरी संघटनेचे अँड.सुरेश पाटील यांचीही राजकिय ताकद मोठी असलेने उमेदवार डॉ.पद्माराणी पाटील यांना मदत होणार आहे.त्यामुळे यान्हीही मतदानांमध्ये आघाडी घेतली आहे.
हेरले गावांमध्ये दहा हजारच्या दरम्यान मतदान आहे.सभापती राजेश पाटील यांचे नऊ ग्रामपंचायत सदस्य असून सत्ता आहे.तर सरपंच बालेचाँद जमादार गटाचे आठ सदस्य आहेत.हे दोन्ही गट एकत्र असलेने डॉ.पदमाराणी पाटील यांचे पारडे जड आहे.कै.रामचंद्र वड्ड यांचा गट,कै.बाळासाहेब माने गटाचे कार्यकर्ते,अध्यक्ष इलाई देसाई,पं.समिती उमेदवार निलोफर मुल्ला यांचा गट धैर्यशील माने यांच्याशी पाठबळ देत आहे.भगवान जाधव यांना बादशहा देसाई,राजेंद्र कचरे,अर्जुन पाटील,हिम्मत बारगीर यांच्या गटाचा पाठिंबा आहे.जवाहर साखर कारखान्याचे संचालक आदगोंडा पाटील यांचा मोठा गट असून त्यांनी धैर्यशील माने यांना पाठींबा दिला आहे.
मौजे मुडशिंगीचे मतदान दोन हजार पंचवीस आहे. येथील ग्रामपंचायतची सत्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाअध्यक्ष गजानन जाधव यांची आहे.त्यांचा निर्णय गुलदस्त्यात आहे.माजी सरपंच बाबासाहेब मंडले यांचा धैर्यशील माने यांना पाठींबा आहे.शिवसेनेचे कृष्णात पोवार व शेतकरी संघटनेचे संतोष जाधव यांचा पाठींबा सभापती राजेश पाटीलांना आहे.शामराव अणुसे ,मारूती अणुसे यांचा पाठींबा भगवान जाधवांना आहे.गजानन जाधव यांचा पाठींबा मिळविण्यात ज्या उमेदवारास यश मिळेल त्यांना एक हजाराच्या पेक्षाही मतदानाचा गठ्ठा प्राप्त होईल,आणि त्यांची सरशी होण्यास मदत होईल.
अतिग्रे गावात दोन हजार आठशे मतदान आहे.कुंभार गटाचे श्रीधर पाटील यांचा पाठींबा धैर्यशील माने यांना आहे.जयवंतराव आवळे गटाचे महादेव चौगुले,पांडुरंग पाटील,बाबासो पाटील,वसंत पाटील आदींचा पाठींबा भगवान जाधव यांना आहे.शिवसेनेचे प्रविण पाटील,आनंदा पाटील,धनाजी पाटील गटाचा पाठींबा सभापती राजेश पाटील यांना आहे.माजी सरपंच दत्ता बिडकर व संदिप यादव यांचा मोठा गट असून त्यांचा पाठींबा गुलदस्त्यात आहे.यांचा पाठींबा मिळविण्यास यश मिळविणाऱ्या उमेदवाराचे पारडे जड होईल.
चोकाक गावचे मतदान दोन हजार चारशे आहे.गटनेते अविनाश बनगे यांच्या गटाचा पाठींबा धैर्यशील मानेंना आहे.श्रीकांत सांगावे यांचा मोठा गट आहे.त्यांची ग्रामपंचायतीवर सत्ता आहे यांचा पाठीबा मिळविल्यास त्या उमेदवाराचे पारडे जड होईल.शिवसेना व शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांचा पाठींबा सभापती राजेश पाटील यांना आहे.भगवान जाधव यांचे विकास कामाचा पैरा फेडण्यासाठी अंतर्गत काही ग्रां.पं.सदस्य कार्यरत आहेत.गजानन माळी यांच्या गटाचा पाठींबा गुलदस्त्यात आहे.
माले गावचे मतदान एक हजार आठशे आहे.गटनेते माजी उपसरपंच बंटी पाटील,भरत गावडे,डी.आर.माने,सागर खोत,बाबूराव खोत,नाना रेवडे यांचा पाठींबा सभापती राजेश पाटील यांना आहे.व्ही.आर.पाटील,माजी सरपंच अभय पाटील यांचा पाठींबा धैर्यशील माने यांना आहे.भगवान जाधव यांना कॉग्रेस कार्यकरत्यांचा पाठींबा आहे.
हालोंडी गावात स्वाभिमानी शेतकरी संघटना मोठ्या प्रमाणात आहे.तसेच दिलीप पाटील,जी.बी.पाटील,अरूण पाटील गुंडा पाटील,सुनिल पाटील,प्रदीप पाटील यांचा पाठींबा सभापती राजेश पाटील यांना पाठींबा आहे.हे गांव या मतदार संघात या निवडणूकीत समाविष्ठ झालेने धैर्यशील माने व भगवान जाधव यांना गावातील कार्यकर्ते यांचा पाठींबा मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
सभापती राजेश पाटील व जि.प.सदस्या प्रमोदिनी जाधव यांनी मतदार संघात विकास कामे मोठ्या प्रमाणात केली आहेत.या मतदार संघात दोघांनाही माननारा मोठा मतदार गट आहे.मात्र डॉ.पद्माराणी पाटील व प्रमोदिनी जाधव जि.प.साठी एकमेका विरोधात लढत असल्याने कोणाला मतदान करायचे या चिंतेत मतदार असून कृतज्ञ व कृतघ्न याची कसोटी लागली आहे.कै.खास.बाळासाहेब माने यांचे परिसरात पंचवीस वर्ष कार्य,माजी खास.निवेदिता माने यांचे दहा वर्ष परिसरातील कार्य असल्याने सातही गावांमध्ये मतदारांना तिन्ही उमेदवारांचे विकास कामे असल्याने "कोणता झेंडा हाती घेऊ "आणि कोणाला मतदान करू ?
कोणाशी कृतज्ञ राहू, आणि कोणाची प्रतारणा करू, अशा सत्वपरीक्षेला सामोरे जावे लागत आहे.

Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

No comments :
Post a Comment