Powered by Blogger.

Tuesday, 14 February 2017

मुरगुड मधील विभागीय साहित्य संमेलन 15 ऐवजी 27 फेब्रुवारी रोजी बाल साहित्यिकांचा रंगणार इंद्रधनुषी मेळा

No comments :


मुरगुड

समीर कटके

मुरगुड ता कागल येथे मराठी साहित्य संमेलन समिती मुरगुड व मराठी बालकुमार साहित्य सभा

कोल्हापूर यांच्या विद्यमाने दि 15 फेब्रुवारी आयोजित केलेले बालकुमार साहित्य संमेलन अपरिहार्य

कारणामुळे सोमवार दि 27 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती संयोजन समितीने दिली

आहे. मुरगुड शहरात प्रथमच विभागीय बाल साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे.

पाच सत्रामध्ये होणाऱ्या संमेलनात कथाकथन ,परिसंवाद , कविता वाचन, सांस्कृतिक कार्यक्रमांचे

आयोजन केले आहे.संमेलनात परिसरातील पाचवी ते आठवी पर्यंतचे सहाशेहून अधिक विद्यार्थी सहभागी

होत आहेत.कागल , राधानगरी, भुदरगड मधून 100 साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. संमेलनाची

सुरवात ग्रंथदिंडीने होणार आहे, मुरगुड नIका क्र. 1 ते श्रीराम मंगल कार्यालय (चिमगाव रोड) या

मार्गावर शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यावेळी लोककलांचे सादरीकरण, टाळकरी ढोल, लेझीम पथके

सहभागी होणार आहेत. शोभायात्रेत शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राणाप्रताप, जिजाऊ, झाशीची

राणी, ताराराणी, बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजर, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, शिवा काशीद यासह

इतर राष्टीय नेत्यांच्या व्यक्तिरेखा सादर करण्यात येणार आहेत.प्रथमच होणाऱ्या समेलनाविषयी

औत्सुक्य निर्माण झाले आहे.यावेळी संयोजक एम डी रावण, जयवंत हावळ, जीवनराव साळोखे, प्रवीण

दाभोळे, विकास मोर्चे, चंद्रकांत माळवदे, प्रा पांडुरंग सारंग, प्रा शिवाजीराव होडगे, प्रा. चंद्रकांत जाधव,

पी आर पाटील, शशी दरेकर, भैरवनाथ डवरी, बी एस खामकर उपस्थित होते.

No comments :

Post a Comment