Tuesday, 14 February 2017
हेरले येथे श्री आशिषानंद महाराज यांच्या संगीतमय शिवकथा कार्यक्रमाचे आयोजन
हेरले येथे शिवगाथा कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करतांना आशिषानंद महाराज,डॉ.अमर स्वामी,पोलीस उपअधिक्षक भारतकुमार राणे.
(छाया-सुधाकर निर्मळे)
(छाया-सुधाकर निर्मळे)
हेरले/प्रतिनिधी - सुधाकर निर्मळे
दि.१३/२/१७
हातकणंगले तालूक्यातील हेरले येथे ज्ञानगंगा फोंडेशनच्या वतीने ११ ते १७ फेब्रुवारी आयोजित श्री आशिषानंद महाराज यांच्या संगीतमय शिवकथेस प्रारंभ झाला आहे.यावेळी आशिषानंद महाराज व वसंतराव सांगवडे यांच्या हस्ते ग्रंथ पालखीचे पूजन करून दिंडीचा प्रारंभ करण्यात आला.पालखीत शिवपार्वती स्थानिक करण्यात आले होते.
यावेळी पालखी मिरवणुकीच्या प्रमुख मार्गाचा दुतर्फा रंगोळी घालण्यात आली होती.न्यू लेटस मंडळ,अरिहंत झांजग्रुप,शिव महिला भजनी मंडळ,ज्ञानगंगा फौंडेशनचे पदाधिकारी ठिकठिकाणी यांनीआरती ओवाळून स्वागत केले.पालखी महादेव मंदिरात जाऊन देवदेवतांचे आशिर्वाद घेऊन महाराज कथास्थळी पोहचले.यावेळी आशीषानंद महाराज ,वसंतराव सांगवडेकर,पोलीस उपअधिक्षक भरतकुमार राणे,डॉ.अमरनाथ स्वामी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी आशिषानंद महाराज यांच्या सुमधूर आवाजात शिवकथास सुरूवात झाली.त्यांनी पौराणिक कथा सांगून शिवकथा ही आजच्या जीवनाला कशी योग्य दिशा दाखवते याचे अनेक दाखले कथन केले.
याप्रसंगी संयोजक डॉ.अमर स्वामी यांचा आशिषानंद महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.काशिनाथ माळी,विनायक उबारे,विवेक स्वामी,नागेश स्वामी,आदीसह हेरले परिसरातील ग्रामस्थ व शिवभक्त उपस्थीत होते.आभार दादासो गुरव यांनी मानले.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment