Powered by Blogger.

Wednesday, 15 February 2017

आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत मुरगूडच्या जान्हवी सावर्डेकरला सुवर्णपदक

No comments :

मुरगुड प्रतिनिधी समीर कटके

नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत येथील विजयमाला मंडलिक गर्लस् ची विद्यार्थिनी
कु.जान्हवी जगदीश सावर्डेकर हिने सुवर्णपदक पटकावले. सुवर्णपदकास गवसणी घालणाऱ्या जान्हवीची
आता थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आँलंपिक निवड चाचणी स्पर्धेसाठी निवड झाली आहे गोवा
येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत जान्हवी सावर्डेकर हिने सुवर्णपदकास गवसणी घातली होती .
त्यामुळेच तिची नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली होती . या स्पर्धेत
जपान,भूतान,चीन ,नेपाळ व भारत या देशाच्या खेळाडूनी भाग घेतला होता .या स्पर्धेत तिने सुवर्णपदक
पटकावले .त्यामुळे तिची आँलंपिक निवड चाचणीसाठी निवड झाली आहे.या स्पर्धा थायलंड येथे होणार
आहेत. या तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.


कु. जान्हवीस कराटे प्रशिक्षक महेश पोवार ,क्रीडा शिक्षक शशिकांत चौगले यांचे
मार्गदर्शन लाभले. तर मुख्याध्यापिका सौ. एस. बी. खामकर,संस्था कार्यवाह आण्णासाहेब थोरवत
संस्था मदतनीस सुनिल मंडलिक , संस्था सेक्रेटरी प्रा. संजयदादा मंडलिक ,अध्यक्ष गजाननराव
गंगापुरे व वडील जगदीश सावर्डेकर यांचे प्रोत्साहन लाभले .

No comments :

Post a Comment