Powered by Blogger.

Wednesday, 15 February 2017

अंतराळात एकाचवेळी104उपग्रह पाठवून भारताचा विश्वविक्रम,

No comments :

PSLV या स्वदेशी बनावटीच्या प्रक्षेपकाच्या मदतीने भारतीय अवकाश संशोधन केंद्र अर्थात इस्त्रोने बुधवारी अवकाशात एकाचवेळी भारतीय उपग्रह कार्टोसेट-2 डीसह 104 उपग्रहांचे प्रक्षेपण करुन विश्वविक्रम केला. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून बुधवारी सकाळी 9 वाजून 28 मिनिटांनी हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले , या मिशनमध्ये भारताचे 3 आणि अमेरिकेतील खासगी संस्थेचे 96 उपग्रहांचा समावेश आहे.  याशिवाय 1-1 उपग्रह इस्त्राइल, कजाकिस्तान, नीदरलंड स्विर्त्झलंड आणि यूएईचा आहे.

  यापूर्वी रशियाने 37 उपग्रह एकावेळी प्रक्षेपित करून विक्रम स्थापित केला होता. त्यानंतर अमेरिकेच्या नासाने 29 उपग्रह एकावेळी प्रक्षेपित केले.अंतराळात एकाचवेळी 104 उपग्रह पाठवून भारताने  विश्वविक्रम करून , रशियाला टाकले मागे टाकले आहे

No comments :

Post a Comment