Wednesday, 15 February 2017
प्रबोधिनीत कालवश आचार्य शांताराम गरुड याना आदरांजली..
प्रतिनिधी समीर कटके
बुधवार ता.१५ फेब्रुवारी
२०१७ रोजी समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस,थोर स्वातंत्र्य सैनिक आणि ख्यातनाम
विचारवंत कालवश आचार्य शांताराम गरुड यांच्या नव्वदाव्या जन्मदिनी समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन
वाचनालयाच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली.आचार्यांच्या प्रतिमेला इंजिनिअर रविकांत भागवत
यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाच्या ३५१व्या अंकाचे
प्रकाशनही करण्यात आले.प्रसाद कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.यावेळी आचार्य गरुड यांच्या
कार्य-कर्तृत्वाचा आढावा अनेकांनी घेतला,प्रबोधनाची चळवळ त्यांनी घालून दिलेल्या मार्गाने बळकट
करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे मत व्यक्त करण्यात आले.यावेळी सर्वश्री शशांक
बावचकर,अजितमामा जाधव,प्रा.रमेश लावटे, प्रा.मिलींद दांडेकर,प्रा.एम.एन.कांबळे,पांडुरंग पिसे,बापूसाहेब
भोसले,नंदकिशोर जोशी,अजित मिणेेकर,भास्कर कांबळे, सौदामिनी कुलकर्णी,नंदा हालभावी,सुयंता
सुतार,तानाजी पोवार,शिवाजी शिंदे,प्रा.विलास पाटील,महालिंग कोळेकर,भीमराव नायकवडी यांच्यासह
प्रबोधिनीचे अनेक कार्यकर्ते ,सहकारी,हितचिंतक उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment