Powered by Blogger.

Thursday, 16 February 2017

सेनेची लोकं मंत्रीपदाच्या खुर्चीला चिकटून , त्यांना लाल दिव्याच्या गाडीची सवय- आता विरोधी पक्षात बसतील असं वाटत नाही.’ पृथ्वीराज चव्हाणांची टीका

No comments :

‘मध्यावधी निवडणुकांची मला फार शक्यता वाटत नाही. शिवसेना सरकारमधून बाहेर पडेल असं वाटत नाही. शिवसेनेची लोकं मंत्रीपदाच्या खुर्चीला चिकटून बसले आहेत. त्यांना लाल दिव्याच्या गाडीची सवय झाली आहे. त्यामुळे ते आता विरोधी पक्षात बसतील असं वाटत नाही.’ असं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं ,

‘राजीनामे द्यायचे असतील तर खिशात न ठेवता फक्त उद्धव ठाकरेंनी पाठिंबा काढून घेतो एवढं सांगितलं तरी पुरेसं आहे. शिवसेना सध्या तरी सत्तेत बाहेर पडेल असं मला वाटत नाही.’ असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले

‘शिवसेनेच्या मंत्र्यांना लाल दिव्याच्या गाडीची सवय, ते सत्ता सोडणार नाहीत,' अशी झोंबणारी टीकाही पृथ्वीराज चव्हाणांनी केली.

No comments :

Post a Comment