Thursday, 23 February 2017
समरसता समतेचा आग्रह कमी करते...जेष्ठ विचारवंत डॉ.रत्नाकर महाजन यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी - समीर कटके
...इचलकरंजी
समता हे स्वयंसिद्ध मूल्य आहे.पण आज समतेबाबत बोलणे म्हणजे
प्रवाहाविरुद्ध पोहण्यासारखे आहे.कारण समतेऐवजी समरसतेची भलावण केली जात आहे.वास्तविक
समरसता समतेचा आग्रह कमी करते.अशावेळी समता प्रस्थापित करण्याची चळवळ गतिशील करण्याची
गरज आहे,त्यासाठी अशी प्रबोधन शिबिरे फार महत्वाची आहेत असे मत जेष्ठ विचारवंत आणि
काँगेसचे प्रवक्ते डॉ.रत्नाकर महाजन यांनी व्यक्त केले.ते समाजवादी प्रबोधिनी आणि
प्रा.डॉ.एन.डी.पाटील प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यकर्ता प्रबोधन शिबिरात;समता,
समानता व समरसता;या विषयावर बोलत होते.शिबिराच्या दुसऱ्या सत्रात जेष्ठ विचारवंत व समाजवादी
प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा.डॉ .एन .डी.पाटील यांनी समाजपरिवर्तन आणि प्रबोधन या विषयाची मांडणी
केली.प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज,शाहिद कॉ.गोविंद पानसरे व कालवश आचार्य शांताराम गरुड
यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला.प्राचार्य डॉ.टी.एस.पाटील यांनी स्वागत व प्रसाद कुलकर्णी
यांनी प्रास्ताविक केले.
डॉ.रत्नाकर महाजन म्हणाले,भारतीय राज्यघटनेने समतेच्या मूल्याबाबत सामाजिक,आर्थिक आणि
राजकीय असा क्रम स्पष्ट केला आहे.समतेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संधीची समानता हवी.पण
त्याऐवजी काही विचारधारा समरसतेचा फासा टाकत आहेत.फॅसिझम नेहमी ढोलताशे वाजवतच येतो
असे नाही तर तो चोरपावलानीही येत असतो.डॉ.महाजन यांनी आपल्या मांडणीत प्राचीन ग्रीक
संस्कृतीपासून भारतीय संस्कृती पर्यंतचे,वेद-उपनिषदापासून चार्वाकांपर्यंत अनेक दाखले देत अतिशय
सखोल पद्धतीने विवेचन केले.आणि कार्यकर्त्यांच्या शंकांचे निरसनही केले.
शिबिराच्या दुसऱ्या सत्रात प्रा.डॉ.एन.डी.पाटील म्हणाले की,जात व धर्म ही हितसंबंधी मंडळींची आयुधे
आहेत.त्याबाबतचा आपला विशेषाधिकार ते सोडत नाहीत.समाजपरिवर्तनाच्या लढाईत राज्यकर्ते बघ्याची
आणि समाजकंटकाना सवंरक्षणाचीभूमिका घेतात.म्हणूनच सत्य नेहमीच वधस्तंभावर आणि असत्य
नेहमी सिंहासनावर बसलेले दिसते.परंतु समाजपरिवर्तनाचे काम नेहमीच वधस्तंभानीच केले
आहे.समाजात प्रबोधनच गुणात्मक परिवर्तन घडवून आणत असते.आपल्या अतिशय ओघवत्या शैलीतील
विवेचनात "समाजपरिवर्तन आणि प्रबोधन"हा विषय प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांनी विविध अंगांनी स्पष्ट
केला.समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती,शहीद कॉ.गोविंद पानसरे
यांचा दुसरा स्मृतिदिन व कालवश आचार्य शांताराम गरुड यांचा नव्वदावा जन्मदिन यानिमित्त
आयोजित केले होते.या शिबिराला डॉ.ज.रा.दाभोळे,माधवराव मोहिते,शशांक बावचकर,राहुल
खांजिरे,शिवाजीराव होडगे,प्रा.विजयकुमार जोखे,प्रकाशराव सातपुते, दलीतमित्र व्यंकप्पा भोसले,प्राचार्य
डॉ.संजय साठे,डॉ.पार्वती पाटील,प्रा.डॉ.संदीप कीर्दत,प्रा.संतोष मारकवाड,एम .एस.चौगुले ,भास्कर
कदम,शांताराम कांबळे,विजय मांडके,तानाजी पोवार,प्रा.रमेश लवटे, अन्वर पटेल यांच्यासह
कोल्हापूर,सांगली,सातारा,सोलापूर,बेळगाव आदी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते आणि विद्यार्थी-
विद्यार्थिनी मोठया संख्येने सहभागी झाले होते.

Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment