Powered by Blogger.

Thursday, 23 February 2017

खंडपीठासाठी आंदोलन का करता ? अशी विचारणा म्हणजे सरकारची दडपशाही - प्रा.एन डी पाटील

No comments :
      

 DNYANRAJ PATIL , KOLHAPUR

 बुधवारच्या खंडपीठ कृतीसमितीच्या सलग ८४ व्यi दिवशीच्या साखळी उपोषणाची सांगता ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी डॉ. पाटील म्हणाले, लोकशाहीमध्ये मोर्चे, आंदोलने हा मार्ग सनदशीर आहे. खंडपीठासाठी आंदोलन का करता? अशी विचारणा करणे म्हणजे आंदोलन दडपण्याचाच प्रकार आहे.
 खंडपीठ कृती समितीने १ डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू केले असून, सर्वपक्षीय कृती समितीदेखील या आंदोलनात सहभागी झाली आहे. बुधवारी सर्वपक्षीय कृती समितीने साखळी उपोषणात सहभाग घेतला.कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार, महापौर हसीना फरास, निवास साळोखे, बाबा पार्टे, माजी महापौर वंदना बुचडे, प्रतिभा नाईकनवरे,सई खराडे चंद्रकांत यादव, लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचे सुभाष जाधव, सिटिझन फोरमचे प्रसाद जाधव, लोकप्रतिनिधी आदींनी उपोषणात सहभाग घेतला.


      यावेळी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेर असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला तसेच पत्रकार बांधव या खंडपीठ लढ्यात सदैव पाठीशी राहतील याची ग्वाही दिली त्याच्याबरोबर कॉम्रेड प्रकाश काम्बरे , क्राईम डायरीचे ज्ञानराज पाटील ,संदीप पोवार व सर्व पत्रकार सदस्य उपस्थित होते 

   रविवार,२६ तारखेला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत खंडपीठासाठी शासकीय विश्रामगृहावर बैठक होणार असून त्यातून सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे उपोषणासाठी खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अड़ प्रकाश मोरे, उपाध्यक्ष अरुण पाटील, सचिव सज्रेराव खोत, महादेवराव आडगुळे, विवेक घाटगे,प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.

No comments :

Post a Comment