Wednesday, 22 February 2017
डास पळवण्यासाठी सुरक्षित व नैसर्गिक उपाय - कडुनिंब तेलाचा दिवा
EDITED BY - DNYANRAJ PATIL
सध्या डासांचा त्रास फारच होत आहे त्यामुळे मलेरिया,डेंगू सारखे जीवघेणे आजारही होतात , आपण मच्छर कॉईल,लिक्विड इत्यादी रासायनिक पदार्थ आपण नियमित वापरतो पण हे हानिकारक व घातक रसायनांपासून बनलेले असल्याने शरीरावर हळूहळू परिणाम करतात , छाती भरणे ,खोकला होणे , धाप लागणे सुरु होते . आता यावर अगदी नैसर्गिक व सुरक्षित उपाय सापडला आहे तो म्हणजे कडुनिंबाच्या तेलाचा दिवा लावणे , एखादे निरंजन किंवा पणती घेऊन त्यात थोडेसे कडुनिंब तेल टाकून वात पेटवा व ज्योत शांत तेवत ठेवा ,एकही डास जवळही फिरकत नाही, कडुनिंबाचे तेल कोणत्याही मेडिकल स्टोअरमधे विकत मिळते
कडूनिंब हा मुळ्चा भारतीय वृक्ष आहे. परंतु अति परिचयाचा असल्यामुळे आपल्याला त्याचे महत्व वाटत नाही, कडुनिंबाची झाडे ज्या देशात निसर्गत: उगवत नाही अश्या अमेरिका जर्मनी सारख्या देशांत कडू निंबाच्या कीटक नाशक गुण धर्मा बद्दल शास्त्र शुद्ध संशोधन व अभ्यास झाला आहे. कडूनिंबापासून बनलेल्या कीटक नाशकामुळे २०० प्रकारच्या किडींचे नियंत्रण करता येते. आणि ते कीटक नाशक मानवा करीता संपूर्ण सुरक्षित आहे. हि माहिती जनहितार्थ सर्वत्र प्रसारित करा !
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)


No comments :
Post a Comment