Powered by Blogger.

Thursday, 23 February 2017

रुकडी जि प मतदार संघ स्वाभिमानी , शिवसेना पुरस्कृत उमेदवार डॉ.पद्माराणी राजेश पाटील प्रतिस्पर्धी वेदांतिका धै. माने यांचा ५१७ मतांनी पराभव करून विजयी

No comments :

हेरले/प्रतिनिधी  -सुधाकर निर्मळे
दि.२३/२/१७

  
        रूकडी जिल्हा परिषद मतदार संघात काँग्रेसच्या प्रमोदिनी जाधव ,स्वाभिमानीच्या डॉ.पद्माराणी पाटील व युवक क्रांती आघाडीच्या वेदांतिका माने याच्यात तिरंगी लढत झाली .यामध्ये डॉ.पद्माराणी पाटील यांना(१०६८५)वेदांतिका माने(१०१६८),प्रमोदिनी जाधव(३६७०)इतके मतदान झाले,बसपच्या दूर्गा संजय कांबळे(६८७).या चार उमेदवारा पैकी ५१७ मताधक्यांनी डॉ.पद्माराणी पाटील विजयी झाल्या.
         रूकडी पंचायत समिती मतदारसंघा मध्ये युवक क्रांती आघाडीचे उमेदवार सत्यजीत इंगळे(४४१०),कॉग्रेसचे उमेदवार संतोष किणिंगे(१३७२) कबीर च०हाण (८८४),शिवसेना लक्ष्मण मुरूमकर(४५३०)इतके मतदान झाले. १२० मताधिक्यांनी शिवसेनेचे लक्ष्मण मुरूमकर विजयी झाले.
       हेरले मतदार संघात स्वाभिमानी पक्षाच्या महेरनिगा मुनिर जमादार(६१६२),युवक क्रांती आघाडीच्या निलोफर मुल्ला (५५४२),कॉग्रेसच्या सुनिता हराळे(२३२९) इतके मतदान मिळाले.६२० मताधिक्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महेरनिगा मुनिर जमादार विजयी झाल्या.
       विजयी उमेदवार यांनी रूकडी,अतिग्रे,मुडशिंगी,चोकाक,माले,हालेंडी,हेरले आदी गावातील ग्रामदैवतांचा आशिर्वाद घेतला.आदी गावांतील शिवसैनिक,शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते,सभापती राजेश पाटील प्रेमी युवक यांनी विजयी उमेदवारांची मिरवणूक गुलालाची उधळण करीत मोटरसायकल रॅली काढून जल्लोश केला.
    

No comments :

Post a Comment