Powered by Blogger.

Thursday, 23 February 2017

दौलतवाडी येथे आगीमुळे साडेचार लाखाचे नुकसान

No comments :

मुरगुड प्रतिनिधी - समीर कटके

दौलतवाडी ता कागल येथे माळवाडी भागात गवताच्या गंजीने पेट घेतल्याने लागलेल्या आगीत

जनावरांचे दोन गोठे, एक राहाते घर,शेतीचे साहित्य, घर उपयोगी साहित्य, गवताच्या गंजी,गोवऱ्यांची

रास असा साडेचार लाखाची मालमत्ता आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.सरसेनापती संताजी घोरपडे

कारखाना,हमीदवाडा साखर कारखाना व बिद्री साखर कारखान्याचे अग्निशमन बंब, ग्रामस्थ व तरुण

मंडळाच्या पाच तासाच्या अथक प्रयत्नामुळे आग आटोक्यात आली.

दुपारी अडीचच्या दरम्यान गावापासून एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या माळवाडी परिसरात शंकर

संतू जाधव यांच्या घराजवळ असणाऱ्या वीज खांबा खालील गवताने पेट घेतला व काही क्षणातच

जवळच असलेल्या गवताच्या गंजीसह जाधव यांचे घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.त्यापाठोपाठ रंगराव

महादेव कानडे व रंगराव बापू जाधव यांचा प्रत्येकी एक गोठा, गवताच्या व गोवरीच्या गंज्या , शिवाजी

बापू जाधव यांच्या गवताच्या व गोवरीच्या गंज्या असा साडेचार लाखाहून अधिक साहित्य आगीत

जळून खाक झाले. साखर कारखान्याचे बंब व ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून आग विझवण्याचे शर्थीचे

प्रयत्न केल्यामुळे भीषण आगीच्या झळा शेजारील घरापर्यंत पोहोचल्या नाहीत.


अल्पभूधारक व भूमिहीन कुटुंबावर जळीत आपत्ती कोसळल्याने हातावर पोट असणारी कुटुंबे हवालदिल

झाली आहेत. गरीब कुटुंबावर ओढवलेल्या आपत्तीमुळे ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत होती. पाच तास

शर्थीचे प्रयत्न सुरु असताना निवडणूक प्रक्रियेत असणाऱ्या महसूल विभागाच्या वतीने कोणीही

घटनास्थळी न फिरकल्यामूळे नाराजी व्यक्त होत होती.

माळवाडीपासून पाचशे मीटर अंतरावर ग्रीन हाऊस कडून येणाऱ्या वीज वाहिनीच्या खांबावरून ठिणग्या

पडल्याने आग लागल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.दरम्यान सत्यतेची पडताळणी करून आगीचे

कारण शोधण्यासाठी शासकीय यंत्रणेने पंचनामा करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

No comments :

Post a Comment