Powered by Blogger.

Tuesday, 14 March 2017

टोलचा झोल , टोल भरताना डेबिट कार्डमधून 40 रुपयांऐवजी 4 लाखांचा गंडा !

No comments :

By Dnyanraj Patil

कर्नाटकातील उडुपीपासून 18 किमी अंतरावर गुंडमी टोल नाका आहे. म्हैसूरमधील डॉक्टर राव आपल्या कारने कोची-मुंबई या  राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करत होते. रात्री 10.30 वाजता ते या टोलनाक्यावर पोहोचले. टोल भरण्यासाठी त्यांनी आपलं डेबिट कार्ड कर्मचा-याकडे दिलं. कर्मचा-याने कार्ड स्वाईप करुन 40 रू.ची पावती राव यांच्याकडे दिली. मात्र तेव्हा
डॉ राव यांना खात्यातून 40 रूऐवजी 4 लाख रुपये डेबिट झाल्याचा मेसेज त्याच्या मोबाइलवर आला,
त्यांनी हा प्रकार टोल कर्मचा-याच्या निदर्शनास आणून दिला. मात्र एवढं होऊनही टोल कर्मचा-यांनी आपली काहीच चूक नसल्याचं सांगत चूक मान्य करण्यास नकार दिला. डॉ राव तब्बल दोन तास म्हणजे 12 वाजेपर्यंत त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते.
टोल कर्मचारी ऐकत नसल्याने नाइलाजाने
टोल नाक्यापासून पाच किमी अंतरावर असणा-या पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी तक्रार नोंद केली. त्यानंतर हेड कॉन्स्टेबलसोबत ते पुन्हा टोल नाक्यावर रात्री 1 वाजता आले. त्यानंतर अखेर टोल नाक्यावरील स्टाफने आपल्या कर्मचा-याची चूक झाल्याचं मान्य केलं. आपल्या कर्मचा-याने नजरचुकीने आकडा वेगळा टाकल्याचं त्यांनी सांगितलं, तसंच सर्व पैसे चेक देऊन परत करतो असं आश्वासन दिलं. पण डॉ राव यांनी मला सर्व रक्कम आत्ताच्या आत्ता तेदेखील रोख हवी असल्याचं सांगितलं.
      डॉ राव यांनी असा पवित्रा घेतल्याने यानंतर टोल नाक्यावरील कर्मचा-याने  कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांशी बोलवुन  3,99,960 रोख रक्कम जमा करुन डॉ राव यांच्या हवाली केली. या सर्व तडजोडीसाठी पहाटेचे चार वाजले.
      एकीकडे कॅशलेस व्यवहारासाठी सरकार आवाहन करत आहे तर दुसरीकडे कॅशलेस व्यवहारातील अशा घोटाळ्यांमुळे कोणीही जाताजाता तुमचा खिसा रिकामा करु शकतो , यामुळे लोकांचा कॅशलेसवरील विश्वास ऊडुन रोखच व्यवहार बरा असं म्हणण्याची वेळ आली आहे

No comments :

Post a Comment