Tuesday, 14 March 2017
स्किल्स ऑन व्हील उपक्रम मुरगुड विद्यालय ज्युनि.कॉलेजमध्ये उत्साहात संपन्न
मुरगुड प्रतिनिधी - समीर कटके
शिवाजी विद्यापीठांतर्गत कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र आणि महाराष्ट्र शासनाचे विद्यापीठ
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र आणि शिक्षण प्रसारक मंडळ
कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्किल्स ऑन व्हील उपक्रम शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर
संचालित मुरगुड विद्यालय ज्युनि.कॉलेजमध्ये उत्साहात संपन्न झाला. प्रशालेचे प्राचार्य पी व्ही शिंदे
यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
प्रारंभी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतरावजी चव्हाण यांच्या जयंती निमित्त प्रतिमापूजन व
दीप प्रज्वलन करण्यात आले. शिवाजी विद्यापीठाचे कौशल्य विकास केंद्राचे सहा. संचालक सचिन
जाधव यांचे प्रमुख मार्गदर्शन झाले.यावेळी शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध तज्ज्ञांनी उपस्थित
राहून विद्यार्थी, पालक, शिक्षक, उदयोन्मुख तंत्रज्ञ, व्यावसायिक, पदवीधर आदींना मार्गदर्शन केले.
के एस क्लिक एज्युकेशन सोसायटीचे अरविंद केळुस्कर यांनी समुपदेशन व स्वयंरोजगार या
विषयी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी बीपीओ व्हॉइस व नॉनव्हॉइस क्षेत्रातील रोजगार संधी, इंग्रजी
संभाषण कौशल्य, मुलाखत तंत्रे आदींबाबत माहिती दिली. सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे
मानसशास्त्र विभागाचे प्रा.दीपक साळोखे यांनी बुद्धिमत्ता, प्रकार, कल, अभिरुची तसेच फलदायी
अध्ययन याबाबत मार्गदर्शन केले.
पेस ट्रेनिग सेंटरचे इलेक्ट्रिकल विभागाचे पी एस कांबळे यांनी गृहउपयोगी साधने निगा व
रोजगाराची संधी या बाबत माहिती सांगितली. याच संस्थेचे ऑटोमोटिव्ह विभागाचे आसमा पठाण व
अभिजित जाधव यांनी दोन व चार चाकी वाहनांची निगा व स्वयंरोजगाराच्या संधी या बाबींवर प्रकाश
टाकला.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थी,शिक्षक, पालक व समस्त नागरिकांना कौशल्याविषयी
जनजागृती करण्यासाठी व प्रत्यक्षात विविध कौशल्य देण्यासाठी विद्यापीठ क्षेत्रातील विविध निवडक
ठिकाणी अशा कार्यशाळा घेतल्या जात आहेत. शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध विषयातील
कौशल्यांवर मार्गदशन करणारे तज्ञ, शासकीय अधिकारी व शासन मान्यता प्राप्त संस्था या
उपक्रमामध्ये सहभागी झाले.
विविध कौशल्यामध्ये प्रामुख्याने संभाषण कौशल्य, समुपदेशन, वाहन चालवताना घ्यायची काळजी,
वाहनांची दुरुस्ती व देखभाल, घरगुती उपकरणांची दुरुस्ती देखभाल, स्टार्टअप संदर्भातील कौशले,
मुलाखत तंत्र, विश्लेषण तंत्रे, कौशल्ये विकास व उद्योजकता संदर्भातील शासनाच्या विविध योजना व
उपक्रम, रोजगाराच्या संधी आदींचा समावेश होता.
या कार्यशाळेत कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी, स्वयंरोजगाराची साधने, अर्थपुरवठा करणाऱ्या संस्था,
विविध शासकीय योजना या बाबत मार्गदर्शन व विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान करण्याचा प्रयत्न
तज्ज्ञांनी केला. आपल्या प्रास्ताविकात प्राचार्य पी व्ही शिंदे यांनी संस्था सचिव प्राचार्य जयकुमार देसाई
यांच्या पुढाकाराने हा उपक्रम घेण्यात येत असल्याचे सांगून संस्था पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
कार्यशाळेस उपमुख्याध्यापक जे डी पाटील, उपप्राचार्य प्रा एस पी पाटील, पर्यवेक्षक एस आर पाटील,पी
बी लोकरे, बी बी बोरवडेकर, एस डी साठे, एम डी पाटील, एस बी सूर्यवंशी, एस जी चांदेकर, अजिंक्य
देवणे, गौरी टकले उपस्थित होते.सूत्रसंचालन ए एन पाटील आभार उपप्राचार्य एस पी पाटील यांनी
मानले.

Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment