Wednesday, 15 March 2017
युरोपिअन कंपन्याची कर्मचाऱ्यांना बुरखा वापरण्यास बंदी
प्रतिनिधी समीर कटके
युरोपिअन युनियन कोर्ट आदेशाने आता कंपन्या आपल्या कार्यालयात कर्मचाऱ्यांनी डोक्यास स्कार्फ
बुरखे वापरण्यास बंदी घालू शकते.
युरोपमध्ये विविध देशात कट्टर राष्ट्रवादी व मुस्लिम विरोधी पक्ष सत्तेत आल्यामुळे धार्मिक
प्रतीके खासकरून बुरख्यासारखी इस्लामिक प्रतीके परिधान करण्यावरून जोरदार रणकंदन माजले आहे.
युरोपिअन कंपन्या कर्मचाऱ्यांवर धार्मिक व राजकीय प्रतीके वापरण्यावर बंदी घालू शकतात.
युरोपिअन युनियनच्या उच्च स्तरीय न्यायालयाने एका महत्त्वाच्या खटल्यामध्ये मंगळवारी हा निर्णय
घेतला आहे.
युरोपिअन कोर्ट ऑफ जस्टीस ECG यांच्या मते जर एखाद्या कंपनीने, फर्मने राजकीय, धार्मिक किंवा
तात्विक चिन्हे धारण करण्यावर अंतर्गत बंदी घालण्याचा निर्णय घेतला तर तो घटनाबाह्य नाही.
बेल्जीअम येथील जीफोरएस या सेक्युरिटी कंपनीने एका मुस्लिम महिलेने बुरखा काढण्यास नकार
दिल्यामुळे गोळीबार करण्याची घटना घडली होती या खटल्याच्या सुनावणी दरम्यान लक्झेम्बर्ग येथील
न्यायालयाने हा निकाल दिला आहे. पण यावर अँम्नेस्टी इंटरनॅशनल या मानवाधिकार संघटनेने या
निर्णयावर आक्षेप घेत हा निर्णय निराशाजनक असून भेदाभेद वाढवणारा आहे असे म्हटले आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

No comments :
Post a Comment