Powered by Blogger.

Wednesday, 15 March 2017

युवा ग्रामीण विकास संस्था या संस्थेचे एड्स जनजागॄतीचे कार्य समाजाला दिशा देणारे व प्रेरणादायी - मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक 

No comments :

हेरले/प्रतिनिधी दि.१५/३/१७
                 
स्थंलातरित कामगार लक्षगट हस्तक्षेप प्रकल्प,युवा ग्रामीण विकास संस्था या संस्थेचे एच.आय.व्ही/एड्स जनजागॄतीचे कार्य समाजाला दिशा देणारे व  प्रेरणादायी आहे.एच.आ.व्ही संसर्गितांना होणारा कलंक आणि भेदभाव कमी करण्यासाठी समाजानेच जनजागॄतीच्या कार्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्यांचे मत मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक  यांनी व्यक्त केले.

उजळार्इवाडी ता.करवीर येथील समर्थ मंगल कार्यालय येथे जागतिक महिला दिनानिमित्य सखी सहेली ग्रुप, कोल्हापुर कंजारभाट स्पोर्टस क्लब व युवा ग्रामीण विकास संस्था, गोकुळ शिरगांव यांच्या वतीने एड्स जनजागॄती आणि माहिती ,शिक्षण आणि संवाद याविषयी माहिती पुस्तीकांचे वाटप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.जागतकि महिला दिनानिमित्य प्रकल्प व्यवस्थापक मोहन सातपुते यांनी नवतरूणीनो निर्भिड सा-या बना गं हे स्वरचित गीत सादर केले या गीताची चर्चा कार्यक्रमात व कार्यक्रम झाल्यानंतर महिला वर्गात चांगलीचं झाली तर अनेक महिलांनी हे गीत लिहूनही घेतले.

या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ती  स्नेहल दुर्गुळे, डॉ.शिल्पा हजारे,मराठा महासंघाच्या महिला अध्यक्षा शैलाजा भोसले,माजी ग्रा. प .सदस्या बरखा मछले,उपसरपंच प्रतिभा पोवार, रूपाली सरोदे,राधा तमायचे,पुनम तमायचे,आरती मछले, सपना रजपूत, शुंभागी दळवी, डी.जी.माने ,संपत दळवी, सागर घोडके, समुपदेशक महेश कांबळेे, सौ.दिपाली सातपुते, मुकेश माने, रणजीत शिंदे, प्रल्हाद कांबळे, प्रदिप आवळे, हालसिधनाथ कांबळे, सचिन आवळे,गणेश बारटक्के, यांच्या सह महिला,युवती यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक ग्रा प सदस्य  महेश मछले यांनी आभार मोहन सातपुते यांनी मानले.

फोटो  :-- उजळार्इवाडी ता.करवीर येथे एच.आय.व्ही /एड्स जनजागॄतीविषयी माहिती ,शिक्षण आणि संवाद या  माहिती पुस्तीकांचे प्रकाशन करतांना मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक,मोहन सातपुते,डी. जी. माने,ग्रा प सदस्य महेश मछले,बरखा मछले,स्नेहल दुर्गुेळे,अफसाना नदाफ,उपसरपंच प्रतिभा पोवार आदी

No comments :

Post a Comment