Monday, 13 March 2017
एन.एम.एम.एस. परीक्षेत २३३ विद्यार्थी यशस्वी
राष्ट्रीय आर्थिक मागास विद्यार्थी शिष्यवृत्ती (एन.एम.एम.एस.) परीक्षेत भुदरगड तालुक्यातील
२३३ विद्यार्थी यशस्वी झाले. तालुक्यातील पी.बी.पाटील हायस्कूल, मुदाळ या शाळेचे १०६ विद्यार्थी
शिष्यवृत्तीधारक झाल्याने उच्चांक झाला आहे. तालुक्यात नऊ वर्षापूर्वी पहिलीपासून सुरू केलेल्या
भुदरगड प्रज्ञा शोध (बी.टी.एस.) परीक्षेची पहिली बॅच आहे. तालुक्यात या परीक्षेमुळे गुणवत्तेत चांगलीच
वाढ झाल्याचे वेगवेगळ्या उपक्रमातून दिसून येते.
तालुक्यातील शाळातून यशस्वी विद्यार्थी संख्या अशी - पी.बी.पाटील हायस्कूल, मुदाळ
(१०६), दौलत विद्यामंदिर, मडिलगे बु.(१९), श्री.शाहू कुमार भवन (१५), वाघापूर हायस्कूल (१०),
नाधवडे हायस्कूल (१०), वि.दा.सावरकर हायस्कूल (९), गारगोटी हायस्कूल (९), माध्यमिक विद्यालय,
दारवाड (७), जवाहर हायस्कूल, निळपण (६), म.फुले हायस्कूल, कोळवण (५), शंकर चक्रू पाटील
विद्यालय, दिंडेवाडी (५), छ.शिवाजी हायस्कूल, तिरवडे (५), माध्यमिक विद्यालय, पांगिरे (४),
विद्यामंदिर, पंडिवरे (४), कुर हायस्कूल, (३), विद्यामंदिर, मानवळे (३), न्यू.इंग्लिश स्कूल, कुर (३),
मडिलगे हायस्कूल (२), विद्यामंदिर, फये (२), कुमार भवन कडगाव (२), कुमार भवन, करडवाडी (१),
कुमार भवन पुष्पनगर (१), कडगाव हायस्कूल (१), टिक्केवाडी हायस्कूल (१)
भुदरगडचे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी संपत गायकवाड यांच्या संकल्पनेतून भुदरगड प्रज्ञा
शोध परिक्षेचा प्रारंभ झाला. राज्य शासनाने आठवीपर्यंत परीक्षा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही
श्री.गायकवाड यांनी पहिली पासून स्पर्धा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्याचे चांगले फळ दिसू लागले
आहे. स्पर्धा परीक्षेचे बळकडू पहिली पासून मिळाले की विद्यार्थी गगनाला भिडतात हे सिद्ध झाले
आहे. ज्ञानरचनावादाचा बाऊ न करता शिक्षकांनी काम केल तर प्रचंड यश मिळू शकते हे या निमित्ताने
दाखवून दिले आहे. १०० टक्के प्रगत शाळा याचे ढोल न पिटता यश मिळू शकते. महाराष्ट्रातील
कोणीही भुदरगड येथे शाळा पाहण्यास आले नव्हते की कोणत्याही वरिष्ठ अधिकारी यांचा वरदहस्तही
नव्हता. भुदरगड चे स्पर्धा परिक्षा व गुणवत्तेचे नाण खणखणीत आहे हे प्रमाणित झाले आहे.
गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांनीही गुणवत्तेचा आलेख चढ़ता राहण्यासाठी प्रयत्न ठेवले आहेत.
शासनाच्या कोणत्याही परिपत्रकाशिवाय सुरू असलेल्या या भुदरगड प्रज्ञा शोध (BTS) परीक्षेचे
यश पाहून बऱ्याच ठिकाणी त्याच धर्तीवर परिक्षा सुरू केल्या आहेत. त्यात करवीर (KTS) तासगाव
(TTS) वाळवा (इस्लामपूर) ITS)कवठेमहांकाळ (KTS) इचलकरंजी (ITS) या नावाने सुरु आहेत.या
परीक्षेसाठी एक पैसाही फी घेतली जात नाही. परीक्षा ऐच्छिक आहे. परीक्षा शालेय अभ्यासक्रमावर
घेतली जाते.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment