Wednesday, 22 March 2017
सीपीआर व गव्ह.मेडीकल कॉलेजमधील डॉक्टर सामूहिक रजेवर , रुग्णांचे हाल
By Dnyanraj Patil Kolhapur
धुळे जिल्ह्यातील घटनेपाठोपाठ लोकमान्य टिळक रुग्णालयातील निवासी डॉक्टरावरील हल्ल्यानंतर डॉक्टर संघटनेने राज्यात सामूहिक रजा आंदोलनाची हाक दिली आहे. न्यायालयाच्या मनाई आदेशामुळे अधिकृत संप पुकारता येत नसला तरी कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर आज (मंगळवार) पासून सामूहिक रजा आंदोलनात सहभागी झाले आहेत.
सामूहिक रजा आंदोलनात सीपीआरमधील 34 वरिष्ठ, 87 कनिष्ठ, तसेच 109 प्रशिक्षणार्थी असे 250 पेक्षा अधिक डॉक्टर सहभागी झाले होते
दरम्यान तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाण्याची भीती वाटत असेल तर जागा खाली करा. रुग्णालय प्रशासन तुमच्या जागी दुसऱ्यांची नेमणूक करेल अशा शब्दात मुंबई हायकोर्टाने मारहाणीच्या निषेधार्थ सामूहिक रजेवर गेलेल्या आंदोलक डॉक्टरांना फटकारलं आहे. सुट्टीच्या नावाखाली संप करणे हा मूर्खपणा व अराजकता निर्माण करण्याचा प्रकार आहे, असं वर्तन म्हणजे डॉक्टरी पेशाला काळीमाच आहे,’ असंही कोर्टाने सुनावलं आहे. त्याचबरोबर, याचिकेवरील सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे. मात्र तोपर्यंत सर्व सदस्य डॉक्टरांना कामावर रुजू होण्यास सांगा, असे आदेशही न्यायालयाने दिले.
No comments :
Post a Comment