Tuesday, 21 March 2017
जि.प.अध्यक्षपदी भाजपच्या शौमिका महाडिक
आज २१ मार्च रोजी झालेल्या कोल्हापूर जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत भाजपाच्या सौ.शौमिका अमल महाडीक यांची तर उपाध्यक्षपदी भाजपच्याच समर्थनाने शिवसेनेच्या श्री. सर्जेराव पाटील वर्णी लागली आहे.
यावेळी झालेल्या मतदानात एकूण सदस्य 67 पैकी उपस्थित 65 होते शौमिका अमल महाडिक - (भाजपा) -यांना 37 मते मिळाली तर प्रतिस्पर्धी बंडा आप्पा माने - (काँग्रेस)-यांना 28 मते मिळाली त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी शौमिका अमल महाडिक 9 मतांनी विजयी झाल्या तर उपाध्यक्षपदी आपले कट्टर समर्थक सर्जेराव पाटील यांची वर्णी लावून शिवसेनेचे आ.चंद्रदीप नरके हे किंगमेकर ठरले.
राजकारणात काही ही होउ शकते याचा कोल्हापूरने परत एकदा अनुभव घेतला.
जे महानगरपालिका निवडणुकीत साध्य झाले नाही ते जि.प. अध्यक्षपद निवडणुकीत साध्य करून नामदार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र कोल्हापुरातील राजकीय वर्तुळात सर्जिकल स्ट्राईक केला आहे.
No comments :
Post a Comment