Powered by Blogger.

Wednesday, 22 March 2017

मुरगुड येथे बिरेश्वर को-ऑप सोसायटीच्या वतीने जनश्री विमा योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वितरण

No comments :

मुरगुड प्रतिनिधी--समीर कटके

जोल्ले उद्योग समूहाच्या बिरेश्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटी मुरगुड ता कागल शाखेकडून केंद्र शासनाच्या जनश्री विमा योजनेतून इयत्ता नववी ते बारावीच्या एकोणतीस लाभार्थी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी 600 रुपयांची शिष्यवृत्ती व इतर तीन विमाधारक पालकांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या वारसांना प्रत्येकी तीस हजार रुपयांचे धनादेश    समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले .प्रमुख पाहुण्या डॉ. सौ.जयश्री रामसे उपस्थित होत्या.
         संस्थेच्या पुढाकाराने केंद्र सरकारची जनश्री योजना तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी व्यापक प्रयत्न सुरु आहेत. या योजनेत वार्षिक केवळ 200 रु भरून आई वडीलांना विमा संरक्षण व कुटुंबातील नववी ते बारावीत शिकणाऱ्या दोन पाल्याना सलग दोन 600 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. जनश्री योजनेतील विमा धारक कुटुंब प्रमुखाचा   मृत्यू झाल्यास वारसांना तीस हजार रुपयाचा निधी देण्यात येतो त्यानुसार कुमार रामचंद्र कांबळे मुरगुड, मंगल आनंदा गायकवाड बिद्री, सुनील दौलू गायकवाड बिद्री यांच्या वारसांना हे धनादेश सौ रामशे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
प्रमुख भाषणात डॉ रामशे यांनी उपस्थित विद्यार्थी पालकांना मौलिक मार्गदर्शन केले.तंत्रज्ञानाचा ज्ञानासाठी वापर करा.प्रवृत्ती चांगली ठेवली तर तंत्रज्ञान वरदानच ठरते. बदलत्या जीवनशैलीत शरीर, मन व बुद्धीसाठी काय विधायक व विघातक याचा सतत विचार करावा लागतो.मुलींनी चांगले स्वयंपाक शिकवा चांगले बनवावे खाऊ घालावे व स्वतः खावे.ऍलर्जी व जुनाट रोगांवर प्राणायाम उपयुक्त आहे.स्वतःची ओळख तयार करा व आई वडिलांच्या कष्टाचे चीज करा. निपाणी शाखेचे संचालक शंकर रामशे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला.
स्वागत प्रास्ताविक व्यवस्थापक सौ शीला थोरवत यांनी केले.यावेळी मुरगुड विद्यालय ज्युनि कॉलेजचे  उपप्राचार्य प्रा.एस पी पाटील, दिनकर माने उपस्थित होते.

फोटो - - मुरगुड येथे बिरेश्वर को-ऑप सोसायटीच्या वतीने जनश्री विमा योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वितरण प्रसंगी डॉ जयश्री रामशे, शेजारी शंकर रामशे, प्रा पाटील, सौ थोरवत व लाभार्थी विद्यार्थी व पालक

No comments :

Post a Comment