Powered by Blogger.

Sunday, 12 March 2017

महिला व मुलींना सक्षम बनवण्यासाठी उडान फाऊंडेशनमध्ये महिला,युवतींनी एकत्र येऊन सोशल मेडियाच्या माध्यमातून सहभागी होण्याचे आवाहन

No comments :

हेरले/सुधाकर निर्मळे
             दि.१३/३/१७
  महिलांच्यावर होणारा अन्याय रोखण्यासाठी आणि महिला  व मुलींना  सक्षम बनवण्यासाठी उडान फाऊंडेशन कोल्हापूरचे भूषण लाड,अँड.उल्का प्रशांत पाटील महिला,युवती ,अहमदनगरच्या डॉ.प्राजक्ता अजित भोगे आदी एकत्र येऊन सोशल मेडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर सामाजिक उपक्रमांचे काम करत आहेत.
           उडान फाऊंडेशनचे भूषण लाड यांनी हा ग्रुप स्थापन करून ते नेतृत्व करीत आहेत.या युवकाची महिलांच्यासाठी चाललेली धडपड पाहून महिलांनासुद्धा प्रोत्साहन मिळत आहे.या ग्रुपमध्ये  सर्व महिला त्यांनी एकत्र केल्या आहेत.महिलांना प्रोत्साहन देणे,त्यांना भयमुक्त करणे,महिलांना विविध क्षेत्रात स्वातंत्र्य मिळवून देणे,गरजू महिलांना आधार देणे,महिलांसाठी सामाजिक उपक्रम राबविण्याचे काम या ग्रुपकडून केले जात आहे.
       या ग्रुपमध्ये १५० पेक्षा जास्त महिला आणि युवती समाविष्ट आहेत.तीन ते चार महिन्यापासून हा ग्रुप काम करतोय.दीपावलीमध्ये ग्रुपमधील सदस्याकडून जुनी कपडे,तांदुळ,कडधान्य,तेल,शैक्षणिक साहित्य जमा करून ते शिये गावातील मतीमंद मुलांच्या संस्थेला भेट देण्यात आले.या वर्षी संक्रांती निमित्त ग्रुपमधील सर्व सदस्यांनी आपल्या यथाशक्तिने तांदुळ,जारी,तेल ,रोख रक्कम जमा करून कोल्हापूरमधील अंध शाळेला दिली.
              या ग्रुपमध्ये डॉक्टर,वकील,इजिनिअर,शिक्षिका,गृहिणी,कॉलेज तरूणी आहेत.ग्रुपमधील सदस्यावर किंवा सदस्यांच्या संपर्कातील महिलांवर किंवा युवतीवरकाही अन्याय होत असेल तर ग्रुपमधील सर्व सदस्य मिळून त्यांना मदत करतात.त्यामुळे सर्वांचा आत्मविश्वास वाढला आहे.
        ग्रुपचे काम प्रत्येक महिला आणि युवती पर्यंत पोहचावे यासाठी हा ग्रुप फक्त व्हॉट्स अँप ग्रुप म्हणून न राहता याचे कायदेशीर नोंदणी करण्याचे काम चालू आहे.पूजा रूग्गे,नम्रता भालकर,पूजा सोळांकुरे,प्रेरणा साळोखे,अँड.उल्का पाटील,नेहाली दिवाण,अनुजा कोते,मंजुशा शेडगे,मृणालिनी इंगवले,अस्मिता निवाळे,विद्या पाटील,सीमा सुर्वे,या सदस्या कार्यात अग्रस्थानी आहेत.
             या ग्रुपमध्ये कोल्हापूर,सांगली,पुणे,अहमदनगर मुंबईसह महाराष्ट्रमधील इतर भागातीलही सदस्य कार्यरत आहेत.या ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी 08698879890 या नंबरवर व्हॉट्स अँप करावे.असे आव्हन केले आहे.
        या ग्रुपच्या अहमदनगरच्या संस्थापक सदस्या डॉ.प्राजक्ता भोगे  प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हणाल्या की,महिलांवर होणारे अन्याय दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत .ते थांबवण्यासाठी प्रयत्न करणे,बऱ्याचवेळा काही स्त्रिया भितीने निमुटपणे अन्याय सहन करतात.आपल्या ग्रुपच्या माध्यमातून त्यांची मनातून भिती दूर करून पाठिंबा देणे,त्यांचा आत्मविश्वास वाढवून प्रत्येकास आत्मनिर्भय आणि सक्षम बनविणे,समाजातील अनिष्ट बंधने झुगारुन प्रत्येक स्त्रीला मान सन्मान व स्वातंत्र्य मिळवून देणे ही आमच्या ग्रुपची उद्दिष्टे आहेत.

No comments :

Post a Comment