Sunday, 12 March 2017
होळीच्या पूर्वसंध्येला प्रशासनाच्या नावानं शिमगा ! वाघापूर पुलाच्या संरक्षण कठड्याच्या पाईपसाठी बोंब मारो आंदोलन.
मुरगूड प्रतिनिधी - समीर कटके
कागल - भुदरगड या दोन तालुक्याना जोडणारा वेदगंगा नदीवरील वाघापूर - मुरगूड हा पूल बांधून
दोन वर्षे झाली.पण या पुलाच्या संरक्षण कंठड्याच्या लोखंडी पाईपस् पावसाळ्यात काढल्या आहेत.त्या
अद्याप बसवण्यात आल्या नाहीत.त्यामुळे या पुलावरील वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे.या पाइपस्
तात्काळ बसवण्यात याव्यात या मागणीसाठी आज मुरगूड येथील नागरिकांनी होळीच्या पूर्वसंध्येला बोंब
मारो आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.येत्या पंधरा दिवसात या पाइपस् न बसवल्यास तीव्र
आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
कागल व भुदरगड या दोन तालुक्याच्या दळण वळणासाठी अत्यंत उपयुक्त असणाऱ्या या पुलाचे काम
दोन वर्षांपूर्वीच पूर्ण करण्यात आले आहे.पुण्याच्या घारपोरे कन्स्ट्रक्शनने हे काम घेतले होते.
आज सायंकाळी मुरगूड नगरपालिकेचे विरोधीपक्षनेते राहुल वंडकर यांच्या नेतृत्त्वाखाली या पुलावर
पाइपस् बसवण्यासाठी होळीच्या पूर्वसंध्येला बोंब मारो आंदोलन केले.यावेळी संदीप भारमल,साताप्पा
डेळेकर,राजू चव्हाण,सर्जेराव आमते,प्रमोद वंडकर,संदेश शेणवी,अमर सुतार,गुंड्या चव्हाण,नवनाथ
सातवेकर,संदीप वाड, स्वप्नील शिंदे ,सचिन सारंग,पप्पू रावण आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.
-- -- -- -- -- -- -- -- -- -- -
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment