Saturday, 11 March 2017
विधानसभा निवडणुकीतील यश म्हणजे मोदी यांच्या नेतृत्वाला जनतेचा पाठिंबाभाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांची प्रतिक्रिया
मुंबई -११ मार्च २०१७
उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मिळालेले ऐतिहासिक यश म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला जनतेने पुन्हा एकदा भरभक्कम पाठिंबा दिला असून विकासाच्या मुद्द्यावर शिक्कामोर्तब केले आहे. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या संघटनकौशल्यामुळे पक्षाचे हे ऐतिहासिक यश साकारले आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी शनिवारी व्यक्त केली. हा भाजपाचा विजय नव्हे तर महाविजय आहे, असे त्यांनी सांगितले.
मा. खा. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, २०१४ ची लोकसभा निवडणूक भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या मुद्द्यावर जिंकली होती. त्यावेळी सुरू झालेली भाजपाच्या यशाची मालिका चालूच असल्याचे शनिवारच्या निकालाने स्पष्ट झाले आहे. गेली अडीच वर्षे मा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केलेल्या कामामुळे देशातील जनतेमध्ये भाजपाबद्दल विश्वास निर्माण झाला. मा. अमित शाह यांच्या संघटनात्मक बांधणीमुळे जनतेच्या पाठिंब्याचे मतांमध्ये रुपांतर झाले.
त्यांनी सांगितले की, जातीपातीचे राजकारण करून विकासाचा मुद्दा मागे ठेवणाऱ्यांना जनतेने मतदानातून उत्तर दिले आहे. भाजपाच्या विकासाच्या मुद्द्याला पुन्हा एकदा जनादेश मिळाला आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment