Powered by Blogger.

Friday, 10 March 2017

स्किल्स ऑन व्हील उपक्रमाचे दि 12 मार्च रविवारी मुरगुड ज्यु. कॉलेजमध्ये आयोजन

No comments :

मुरगुड प्रतिनिधी

शिवाजी विद्यापीठांतर्गत कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र आणि विद्यापीठातील महाराष्ट्र
शासनाचे विद्यापीठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र याच्या संयुक्त
विद्यमाने स्किल्स ऑन व्हील उपक्रमाचे दि 12 मार्च रविवार सकाळी 10 वा. शिक्षण प्रसारक मंडळ
कोल्हापूर संचालित मुरगुड विद्यालय ज्यु. कॉलेजमध्ये आयोजन करण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थी,शिक्षक, पालक व समस्त नागरिकांना कौशल्याविषयी
जनजागृती करण्यासाठी व प्रत्यक्षात विविध कौशल्य देण्यासाठी विद्यापीठ क्षेत्रातील विविध निवडक
ठिकाणी बसमध्ये, शाळा-महाविद्यालय आवारात कौशल्य प्रदान केले जात आहे. शिवाजी विद्यापीठ
परिक्षेत्रातील विविध विषयातील कौशल्यांवर मार्गदशन करणारे तज्ञ, शासकीय अधिकारी व शासन
मान्यता प्राप्त संस्था या उपक्रमामध्ये सहभागी होऊन कौशल्ये देणार आहेत.

विविध कौशल्यामध्ये प्रामुख्याने संभाषण कौशल्य, समुपदेशन, वाहन चालवताना घ्यायची काळजी,
वाहनांची दुरुस्ती व देखभाल, घरगुती उपकरणांची दुरुस्ती देखभाल, स्टार्टअप संदर्भातील कौशले,
मुलाखत तंत्र, विश्लेषण तंत्रे, कौशल्ये विकास व उद्योजकता संदर्भातील शासनाच्या विविध योजना व
उपक्रम, रोजगाराच्या संधी आदींचा समावेश आहे.

दि 12 मार्च रविवार रोजी सकाळी आठ वाजता तज्ञ व मार्गदर्शकांसह पाच सहा बसेस विद्यापीठ
परिक्षेत्रातील विविध निवडक गावांमध्ये जाऊन विद्यार्थी, शिक्षक, नागरिकांना दिवसभर कौशले देणार
आहेत.केवळ वर्गखोलीपुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता त्याची व्याप्ती समाजातील विविध घटकांपर्यंत
पोहचवणे हा या उपक्रमाचा उदद्देश आहे. मुरगुड विद्यालय ज्यु. कॉलेजची या उपक्रमासाठी निवड झाली
असून रविवारी हा उपक्रम विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. मुरगुड परिसरातील
महाविद्यालयीन विद्यार्थी,तरुण मंडळे, सेवाभावी संस्था यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, सोबत लेखन
साहित्य आणावे असे आवाहन संयोजकानी केले आहे.

No comments :

Post a Comment