Friday, 10 March 2017
कोल्हापुरात कोल्ड्रींक्स हाऊस व हॉटेल्समध्ये कूलिंग चार्जेसच्या नावाखाली ग्राहकांची लूटमार
सुधाकर निर्मळे/हेरले प्रतिनिधी दि.९/३/१७
कोल्हापुर वाहतूक मार्ग लगतच्या कोल्ड्रींक्स हाऊस व हॉटेल्समध्ये कूलिंग चार्जसच्या नावाखाली शीतपेयांची जादा किंमत घेऊन ग्राहकांची फसवणूक केली जात आहे.
उन्हाचा कडाका वाढल्याने घशाला कोरड पडते. आपली पावले आपोआप शीतपेय गृहाकडे वळतात.आपण आपले आवडते शीतपेय पितो अन तहान भागल्याने मन तृप्त होते.घेतलेल्या शीतपेयाचे पैसे विचारतो त्यावेळी एमआरपी पेक्षा पाच ते दहा रूपयांनी जास्त किंमत वसूल केली जात आहे.आपण त्या किंमतीने थंडगार होऊन निमुटपणे जादा पैसे देतो किंवा वाद घालत बसतो,शेवटी किंमत न विचारता थंडगार पिल्यामुळे पैसे द्यावे लागतात.असे प्रकार सर्रास तालूका,जिल्हामार्ग ,राज्यमार्ग रस्त्यालगतच्या शीतपेय गृहामध्ये सुरू असून ग्राहकांची लूट सुरू आहे.या प्रकारांना कोण चाप लावणार संशोधनाचा मुद्दा ठरतआहे.यापेक्षा आपणच प्रथमतः थंडपेये घेण्याअगोदर किंमत विचारुन प्यावीत आणि आर्थिक लूटीपासून बचाव करावा.म्हणून नागरिंकावर उन्हाळा संपेपर्यंत या लूटीपासून बचाव होणेसाठी "जागो ग्राहक जागो"अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
उन्हाळ्यामध्ये वाढत्या उष्म्यामुळे शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन वारंवार तहान लगाते आणि आपल्याला तृष्णा शमविण्यासाठी पाणी प्यावे लागते.मात्र आपली तहान भागवण्यासाठी पाणी थंड मिळाले तर आनंद मिळतो.मिनरल थंड पाण्याच्या बाटलीची किंमत वीस रूपये असल्याने बहुदा सर्वजन शीतपेये पिण्यास पसंती देतात.विविध कंपनींची अनेक शीतपिये बाजारात दोनशे,अडीचशे,पाचशे,साडेसातशे मिली व एक ते दोन लिटर मध्येही उपलब्ध आहेत.शक्यतो सर्रास दोनशे व अडीचशे मिली असणारी शीतपीये विक्री होतात.
तालूका ,जिल्हा,राज्य मार्गावरील रस्त्यालगत अनेक हॉटेल्स आहेत.या हॉटेल्समध्ये खादयपदार्थाबरोबर विविध कंपनींची शीतपीये विक्रीस ठेवलीली असतात.प्रवास करणारे तहान लागल्यानंतर तसेच लॉंग ड्रायव्हिंग केल्याने थकवा आल्यामूळे थंडपेये पिण्यासाठी या हॉटेल्समध्ये थांबतात.एकावेळी अनेक प्रवासी येतात.थंडपेयांची मागणी केली जाते,विविध कंपनींची दोनशे मिली थंडपेये कंपनी किंमत तेरा रूपये आहे आणि ज्यावेळी पैसे देण्याची वेळ येते तेंव्हा त्या थंडपेय बाटलीवरील एमआरपी पेक्षा पाच ते दहा रूपयांनी जादा किंमत सांगितली जाते.थंडपेये पिल्यामूळे एकतर निमुट पैसे दयावे लागतात तसेच अनेक वेळा वादाचा प्रसंग उदभवतो आणि पैसेही निमूटपणे दयावे लागतात.असे प्रकार सर्रास शीतपेये गृहातून वाढीव वीजबीलाच्या नावाखाली प्रत्येक बाटलीस एमआरपी पेक्षा वाढीव पाच ते दहा रूपये स्वयंम घोषीत किंमत वाढवून ग्राहकांची लूट केली जात आहे.
पावसाळा व हिवाळ्यामध्ये त्या थंड शीतपेयांची किंमत एमआरपी प्रमाणेच घेतली जाते.मात्र ऐन उन्ह्याळ्यात ग्राहकांची मागणी जास्त असल्याने बक्कळ पैसा मिळविण्याच्या उद्देशाने जादा किंमतीने पैसे वसूल केले जात आहेत.मालकांशी या वाढीव किंमती बद्दल विचारले असता आम्हची कोठे तक्रार करायची तिथे करा आम्हास काहीही फरक पडत नाही,

दारूसाठी ब्लॅकने मोठी रक्कम मोजून खरेदी होते मग आम्ही थंडपेयाच्या प्रत्येक बाटलीमध्ये जादा पाच दहा रूपये कमविले तर काय बिघडते ? दारूचे पैसे ते चालतात.
अशी उद्धट उत्तरे देऊन ग्राहकांचा अपमानही केला जात आहे.
स्वतःच्या पैशाने थंडपेये प्यायची अन वादावादी करून अपमान करून घेण्यापेक्षा पहिला थंडपेयाची किंमती विचारून निर्णय घ्यावा.त्यामुळे आर्थिक लूट व वादावादीचा प्रसंग टाळता येईल.या हॉटेल्समधील पठाणी वसूली थांबविण्यासाठी जिल्हा शीतपेये व्यापारी यांनी आपल्या हॉटेल्स मालकांना किंमती बद्दल सक्त सूचना देऊन अशी होणारी ग्राहकांची आर्थिक लूट थांबबावी.

जिल्हा वैध मापनशास्त्र यंत्रणा,अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अश्या लोकांवर कारवाई का करत नाही ?
प्रत्येक वेळी ग्राहक दोन,पाच रुपयांसाठी तक्रार करणार नाही तेंव्हा या विभागाने स्वतः दखल घेऊन कारवाई करावी
नागरिकांनीही शीतपेयेतून होणारी आर्थिक लूटीपासून बचाव होण्यासाठी शितपेयांना फाटा देत तहान भागविण्यासाठी रसवंती गृहातील ताजा रस,मोसंबी ज्यूस,थंडगार सरबत,पपई,अननस,कलिगंड यांचे सॅलड ,लस्सी,सोडा वॉटर यांना पसंती देऊन तृष्णा भागवावी.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

No comments :
Post a Comment