Thursday, 6 April 2017
मेकॅनिकल अॅण्ड इंजिनिअरिंग कामगार युनियनची ६० वी वार्षिक सभा शिरोली येथे संपन्न
हेरले / प्रतिनिधी : दि.५/४/१७
लक्ष्मण कांबरे- मेकॅनिकल अॅण्ड इंजिनिअरिंग कामगार युनियनची ६० वी वार्षिक सर्वसाधारण सभा शिरोली येथील श्रमिक कार्यालयाच्या पंटागणात संपन्न झाली .सभेच्या अध्यक्षस्थानी कॉ . अतुल दिघे होते .
प्रत्येक गावात विम्याचा डॉक्टर नेमा असा ठराव सभेत करण्यात आला.
इएसआय हॉस्पीटल सुरू करावे त्यांचे खाजगीकरण होवू नये यासाठी मोठ्या प्रमाणात केलेल्या आंदोल नामुळे आज इएसआय हॉस्पीटल सुरू होत आहे .केवळ हॉस्पीटल सुरू होवून चालणार नाही तर कागलपासुन वडगांव पर्यंत कामगार संख्या असणाऱ्या प्रत्येक गावांत इएसआयचा डॉक्टर नेमला पाहीजे . यामुळे कामगारांच्या कुंटुबियानाही वैद्यकीय सुविधा मिळविणे सोयीचे होईल . तसे विनंती करणारे पत्र
इएसआय ला घावे असा ठराव मे . अॅ . इं . काम . युनियन च्या ६० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आला .
मराठा, धनगर, मुस्लीम यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे, सहकारी व खाजगी कंपन्यातही आरक्षण असावे, शेतकरी कर्जमाफी करावी व उत्पादन खर्चाच्या दिडपट हमी भाव मिळावा, कोल्हापूर मध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे असे ठरावही करण्यात आले . संघटनेने वर्षभरात केलेली आंदोलने, करार -मदार इत्यादींची माहीती संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ . प्रकाश कांबरे यानी दिली . तर संघटनेचा जमाखर्च, ताळेबंद खजिनदार सौ . रजनी पाटील यांनी वाचून दाखविला त्यास सभेने एकमताने मंजूरी दिली .
अमित सुतगिरणीच्या कार्यकर्ते यांना मारामारी प्रकरणात गोवले गेले होते त्यातून न्यायालयात त्यांना निर्दोष ठरवल्याबद्दल सभेमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला . कॉ . संजय गावडे यांनी सर्व ठरावांना पाठींबा दिला व कामगारांनी विविध आंदोलनास मोठया प्रमाणात सहभागी व्हावे असे सुचविले व संघटनेचे कामकाज कॉ . अतुल दिघे व कॉ . प्रकाश कांबरे यांनी चांगल्या पद्धतीने चालविले आहे ते तसेच पुढे चालवावे असे सुचविले .
यावेळी दि . कोल्हापूर स्टील लि, साउंड यु . कागल,तारदाळ , शिरोली, परफेक्ट पिन्स, नॅट फौंड्री, श्रीराम फौंड्री, मशीन शॉप, शिरोली महालक्ष्मी रिशेलर्स, तेजस अॅटोमेक, कोल्हापूर ऑटो, गोकुळ शिरगांव, श्रीराम यु .०१, निता इंजि. अॅक्यूरेट इंजि.,रवि इंडस्ट्रीज, यश मेटॅलिक्स, शिरोली . तसेच अलटेक ऑलॉईज कागल , आष्टा लायनर्स, कस्तुरी फौंड्री आष्टा येथील कामगार प्रतिनिधी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते . सूत्रसंचालन प्रकाश कांबरे यांनी केले. आभार राजकुमार जाधव यांनी मानले.
फोटो - वार्षिक सभेमध्ये बोलतांना संघटनेचे अध्यक्ष कॉ. अतुल दिघे व इतर मान्यवर.
No comments :
Post a Comment