Powered by Blogger.

Thursday, 6 April 2017

जिओ मुळे इतर मोबाईल कंपन्या तोट्यात

No comments :
प्रतिनिधी ज्ञानराज पाटील

जिओच्या 10 कोटी ग्राहकांपैकी 7 कोटी 20 लाख ग्राहकांनी प्राईम मेंबरशीप घेतली आहे, अजुनही 15 एप्रिलपर्यंत अखेरची मुदतवाढ देण्यात आली आहे त्यामुळे हा प्राईम मेंबरशिपचा आकडा वाढणार आहे
पण याचवेळी इतर मोबाईल कंपन्या तोट्यात आहेत कारण लोक फुकटात जिओच्या प्राइम मेंबरशिपचा पुरेपूर उपयोग करत आहेत,  इतर कंपनीच्या रिचार्ज विक्रीचा आकडा निम्म्यापेक्षा कमी झाला आहे
मोबाईल कंपन्यांच्या सेल्समनशी चर्चा केली असता हे असेच चालले तर विक्री घटल्याने कंपन्या गोत्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Aircel, Docomo, Telenor, Relince Gsm यासारख्या छोट्या कंपन्यांना तर शेवटची घरघर लागली आहे असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे तर Idea, Vodafone, Bsnl, Airtel यांना प्रचंड प्रमाणात तोटा सोसावा लागत आहे.

No comments :

Post a Comment