Friday, 7 April 2017
जिओची समर सरप्राईज ऑफर बंद ? आजपर्यंत 303चं रिचार्ज केलेल्यांनाच पुढील 3 महिने मोफत सेवा
प्रतिनिधी - ज्ञानराज पाटील
जिओनं समर सरप्राईज ऑफर लॉन्च करत पुन्हा ग्राहकांना 3 महिन्यांसाठी मोफत डेटा आणि कॉलिंगची सेवा देण्यात येईल असं जाहीर केलं. यात 99 रुपये देऊन प्राईम मेंबरशिप घेणं बंधनकारक होतं. तसंच 303 रुपयांचं रिचार्ज 15 एप्रिलपर्यंत करणंही बंधनकारक करण्यात आलं होतं.
ही योजना येत्या २४ तासांत मागे घेण्याचे आदेश भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने रिलायन्सला दिले आहेत. या योजनेसाठी ग्राहकांची नोंदणी करून घेण्यासही कंपनीला मज्जाव करण्यात आला आहे.
आता या योजनेचा लाभ यापुढे घेता येणार नाही. ज्यांनी ही सेवा यापूर्वीच घेतली आहे त्यांची ती पूर्ववत राहणार आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment