Friday, 7 April 2017
नरेंद्र पाटीलचे गणित प्रज्ञा परीक्षेत घवघवीत यश, महाराष्ट्रात अकरा प्रज्ञावंतामध्ये येण्याचा बहुमान
कागल/ प्रतिनिधी दि.७/४/१७
कागल येथील श्री शाहू हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचा विदयार्थी नरेंद्र मोहन पाटील याने गणित प्रज्ञा परीक्षेत महाराष्ट्रात अकरा प्रज्ञावंतामध्ये येण्याचा बहुमान मिळविला आहे.
कु. नरेंद्र पाटील याने गणित पूर्व प्राविण्य, गणित प्राविण्य परीक्षा उत्तीर्ण झालेने त्याची प्रज्ञा परीक्षेसाठी निवड झाली होती. गणित प्रज्ञा परीक्षेत घवघवीत यश मिळविल्याने महाराष्ट्रात अव्वल अकरा विदयार्थ्यामध्ये येण्याचा बहुमान मिळविला.
संस्थेचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, अध्यक्षा श्रीमती शिवानी देसाई, कौन्सील मेंबर युवा नेते दौलत देसाई, बाळासाहेब डेळेकर, मुख्याध्यापक महावीर रूग्गे, उपमुख्याध्यापक रविंद्र देशमाने, पर्यवेक्षिका एस.ए. कुलकर्णी यांची प्रेरणा व संदिप मुदाण्णा यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो - कागल येथील श्री शाहू हायस्कूलमध्ये गणित प्रज्ञावंत नरेंद्र पाटील याचा सत्कार करतांना मुख्याध्यापक महावीर रूग्गे व इतर मान्यवर
( छाया- सुधाकर निर्मळे)
No comments :
Post a Comment