Saturday, 8 April 2017
मोहन सातपुते यांना एड्स जनजागृती व पत्रकारिता कार्याबदल ' उत्कृष्ट व आदर्श पत्रकारिता पुरस्कार '
हेरले/ प्रतिनिधी
हेरले/प्रतिनिधी दि.८/४/१७
युवा ग्रामीण विकास संस्था,एच. आय. व्ही/ एड्स स्थंलातरीत कामगार लक्षगट हस्तक्षेप प्रकल्प ,गोकुळ
शिरगाव व कागल एमआयडीसी, (कोल्हापूर ) या संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक श्री. मोहन गणपती सातपुते यांना एच .आय .व्ही / एड्स जनजागृती व पत्रकारिता या क्षेत्रातील कार्याबदल ' उत्कृष्ट व आदर्श पत्रकारिता पुरस्कार ' नुकताच प्राप्त झाला आहे.बी आर महाजन फौंडेशन,पाचगाव व आझाद तरुण मंडळ ,उजळाईवाडी यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला.
गेली दहा वर्षे एड्स क्षेत्रात तर वार्ताहर म्हणून १९९८ पासून ते कार्यरत आहेत.त्याचे शिक्षण सायबर कॉलेज, कोल्हापूर येथून( एम. एस. डब्ल्यू ) झाले असून कमवा व शिका या योजनेत ते समाविष्ट होते.
त्याच्या या यशात संस्था मार्गदर्शक प्राचार्य अर्जुन आबिटकर,अध्यक्ष अजित आबिटकर,संचालक अतुल निकम सरकार व युवा भरारी प्रकल्प कडील सर्व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले .
No comments :
Post a Comment