Tuesday, 23 May 2017
मुरगुड येथे फुटबॉल प्रशिक्षण शिबिराचे दि 26 ते 31 दरम्यान आयोजन
मुरगुड प्रतिनिधी दि 23 ( समीर कटके )
मुरगुड स्पोर्टस असोसिअशनच्या वतीने दि 26 ते 31 मे दरम्यान फुटबॉल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. या सहा दिवसाच्या प्रशिक्षण शिबिरासाठी एन आय एस कोच प्रा. राहुल पाटील मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी 7 ते 10 प्रशिक्षण होणार असून खेळाच्या बेसिक कौशल्यांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना फुटबॉल सारख्या खेळाचे शालेय व महाविद्यालयीन स्तरावरील खेळाडूंना तंत्रशुद्ध कौशल्य मिळावे यासाठी या शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती असोसिएशनचे सचिव प्रा पृथ्वीराज कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
या शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक प्रा.राहुल पाटील महाराष्ट्र राज्य शालेय स्तरीय संघ निवड संघाचे सदस्य आहेत. शिबिरामध्ये आंतराष्ट्रीय स्पर्धांच्या नियमांची माहिती, सरावाच्या पद्धती, व्यायाम प्रकार , शालेय संघाच्या उभारणीसाठी आवश्यक मार्गदर्शन तसेच जिल्हा व राज्यस्तरीय संघातली खेळाडूंची निवडप्रक्रिया व निकष याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या शिबिरासाठी मुरगुड व परिसरातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील क्रीडा शिक्षकांनी उपस्थित राहावे व आपल्या शाळेतील संघाच्या बांधणीसाठी खेळाची तंत्रे आत्मसात करावीत असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे .सदर शिबिरासाठी खेळाडूंनी नाव नोंदणी रितिका कन्स्ट्रक्शन सागर भोसले व पूजा आईस्क्रीम पांडुरंग पुजारी याठिकाणी करावी असे आवाहन मुरगुड स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी प्रा डॉ सुशांत मगदूम, सागर भोसले, भरत लाड, महादेव खराडे, एकनाथ आरडे, समीर कटके आदी उपस्थित होते.
No comments :
Post a Comment