Powered by Blogger.

Wednesday, 24 May 2017

शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी मध्ये वादळाने प्रचंड नुकसान

No comments :

प्रतिनिधी सतिश लोहार   
    
       कोल्हापूर जिल्हयात विविध ठिकाणी प्रचंड वादळ व पाऊस झाला शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी मध्ये वादळ झाले त्यामध्ये  शिवनाकवाडी गावात ,यशवंत कॉलनी , दत्त कॉलनी मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले , बऱ्याच घराची पत्रे , कौले उडून गेली आहेत , झाडे पडली आहेत , घराच्या भिंती पडल्या आहेत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे , विजेच्या डांबावरील तारा तुटल्या आहेत त्यामुळे विद्युत पुरवठा बंद आहे. मुळातच   पाण्याची समस्या असणारे ठिकाण  म्हणजे यशवंत कॉलनी विदयूत पुरवठा बंद असल्याने पाणी पिण्यासाठी सुध्दा नाही. तातडीने ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी हि विनंती लोकांच्या कडुन होत आहे. शिवनाकवाडी गावामध्ये  ज्या ज्या ठिकाणी ही आपत्ती झाली आहे त्या कुटूंबांना मदतीची गरज आहे . शासनाने  योग्य ती मदत वेळीच त्यांना द्यावी अशी सर्वांची अपेक्षा आहे ,

No comments :

Post a Comment