Thursday, 25 May 2017
या सरकारला लाज कशी वाटत नाही: मुरगूडला बहुजन न्याय हक्क परिषदेत प्रा. जोगेंद्र कवाडे यांची जहरी टीका
मुरगूड प्रतिनिधी (समीर कटके) दि 24 :
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनला एक लाख कोटी, समृद्धी महामार्गाला 46 हजार कोटी, समुद्री मार्गासाठी 56 हजार कोटी खर्च करणाऱ्या सरकारकडे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 30 हजार कोटी नाहीत याची या सरकारला लाज वाटत नाही. सीमेवर कोणी गुजराथी बांधव शाहिद होत नाही तर दिन दलित , आदिवासी बहुजन मराठा कुणबी सीमेवर मरत आहे त्यांच्या चितेवर सत्तेच्या पोळ्या भाजू नका अशी जहरी टीका
माजी खासदार,पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी केले
मुरगूड (ता.कागल) येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्य आयोजित बहुजन न्याय हक्क परिषदेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.हिंदूराव कांबळे अध्यक्षस्थानी होते. कागल तालुका आंबेडकरप्रेमी यांच्यातर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत मराठा समाजाला 16 टक्के व मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण मागणीचा व कोल्हापूरच्या विद्यापीठाचा छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार करावा असा एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला.
प्रा कवाडे म्हणाले भारतातील वैदिक संस्कृतीने शिव शाहूंच्या मराठा समाजास शुद्र ठरवून नेहमी अपमान केला शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेकास विरोध त्यातील विधी असोत किंवा शाहूंचे वेदोक्त प्रकरण अशी अनेक उदाहरणे इतिहासात आहेत.पण ब्राह्मण्यवाद्यांनी नेहमी मराठ्यांचा बुद्धिभेद केला. मराठा समाजास आरक्षण मिळावे म्हणून दलितांनी आंदोलने केली पण गोळवलकर ते भागवतांपर्यंत संघनेत्यांनी दलितांच्या आरक्षणास विरोध केला त्यावेळी मात्र मराठा समाज रस्त्यावर उतरला नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.हजारो वर्षे शर्यतीत मागे असणारे मागेच राहू नयेत यासाठी घटनेने दिलेले दलितांचे आरक्षण कोणी हिरावून घेऊ शकत नाही. घटना निर्मितीच्यावेळीच 340 कलमाची तरतूद करून मराठा समाजास आरक्षण देण्याची भूमिका डॉ आंबेडकरांनी घेतली याचे डॉ पंजाबराव देशमुख साक्षी होते.मराठा समाजाने आंबेडकरांचे शुद्र कोण होते हे पुस्तक वाचले असते तर त्यांना एक मराठा लाख मराठा घोषणा करून जागृती करावी लागली नसती असेही ते म्हणाले.
पश्चिम महाराष्ट्र पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष नंदकुमार गोंधळी,कास्ट्राईब महासंघाचे महासचिव नामदेव कांबळे,दलित क्रांती सेनेचे अध्यक्ष अशोकराव आसोदे, जेष्ठ विचारवंत प्रा.जी.डी.कांबळे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
स्वागत एम डी कांबळे यांनी,प्रास्ताविक एस पी कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. व्ही ए कांबळे व आभार सात्तापा कांबळे यांनी मानले.
या कार्यक्रमास सदासाखरचे संचालक चंद्रकांत गवळी,नामदेवराव मेंडके,स.पो.नि.राकेश हांडे, दलितमित्रपी.एस.कांबळे,प्रा.डी.डी.चौगले,
बळवंत माने, एस.आर.बाईत,संजय हेगडे,लागमंण्णा कांबळे,सुधाकर सुळकूडे,विठ्ठल कांबळे,शरद कांबळे,सुधाकर माने,एन.डी.जत्राटकर, देवानंद कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.ही परिषद यशस्वी करण्यासाठी अनिल सिध्देश्वर,साताप्पा कांबळे,सुरेश कांबळे, प्रा.एल.व्ही.शर्मा,एम.डी.कांबळे, दिलीप कांबळे,राजेंद्र कांबळे,अशोक कांबळे,मिलिंद प्रधान,दादासाहेब सरदेसाई, एस.पी.कांबळे,ग्रामसेवक साताप्पा कांबळे आदींनी परिश्रम घेतले.
---------------------
फोटो : मुरगूड येथे बहुजन न्याय हक्क परिषदेत बोलताना माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे व्यासपिठावर हिंदूराव कांबळे,नामदेवराव कांबळे,नंदकुमार कांबळे आदी मान्यवर.
No comments :
Post a Comment