Thursday, 25 May 2017
श्री. लतीफ मगदूम यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्काराने गौरव
कोल्हापुरात आज (बुधवार) केशवराव भोसले नाट्यगृहात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला.
समाजातील दीनदलित, पीडितांच्या उत्थानासाठी अविरत काम करणाऱ्या सहा संस्थांना शाहू, फुले, आंबेडकर पुरस्काराने गौरव करण्यात आला. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्काराने श्री. लतीफ मगदूम यांना सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
श्री. लतीफ मगदूम हे पुण्यातील MCA सोसायटीचे मानद सचिव व हाजी मोहम्मद गुलाम आजम एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त म्हणून काम पाहत आहेत, ते विद्यार्थी दशेत असल्यापासूनच गत चाळीस वर्षे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय व अथक कार्य करीत आहेत, राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रक्रियेत सहभागी होऊन त्यास सातत्याने हातभार लावत आहेत.
त्यांच्यासह राज्यातील १२५ जणांना २०१६-१७ करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रोख २५ हजार रुपये आणि सन्मानपत्र असे त्याचे स्वरूप आहे. या वेळी ना. चंद्रकांतदादा पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर हसिना फरास, आ. सुरेश हाळवणकर, आ. डॉ. सुजित मिणचेकर व मान्यवर उपस्थित होते.
No comments :
Post a Comment