Friday, 26 May 2017
भारतीय प्रवाशांची मानसिकता- नविन तेजस एक्सप्रेसचे हेडफोन पळवले
मुंबई-गोवा मार्गावर धावणारी बहूचर्चित तेजस एक्सप्रेस नुकतीच सुरू झाली आहे. अत्याधुनिक,जलद आणि सर्व सोयी सुविधा असलेल्या तेजस एक्सप्रेसचं प्रवाशांनीही स्वागत केलं आहे. तेजस एक्सप्रेसच्या बुकिंगलाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
पण भारतीय लोकांना कितीही चांगले दिले तरी ते आपले गुण दाखवून देतात, तेजस एक्स्प्रेसच्या पहिल्याच दिवशी काही प्रवाशांनी प्रवासात हेडफोन लंपास केले आहेत.
प्रवाशांच्या मनोरंजनासाठी तेजस एक्सप्रेसमध्ये एलईडी स्क्रिन लावलेत. त्यावर गाणी आणि चित्रपट पाहता येतात. त्याचेही नुकसान केले आहे.
तसेच गाडीच्या इतर साहित्याची मोडतोड झाली आहे व सुंदर अशी गाडी गलिच्छ बकाल झाली आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment