Powered by Blogger.

Friday, 26 May 2017

मौजे वडगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सारीका चौगुले यांची बिनविरोध निवड

No comments :

हेरले/ प्रतिनिधी दि. २६/५/१७
      हातकणंगले तालूक्यातील मौजे वडगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सारीका धर्मेन्द्र चौगुले यांची बिनविरोध निवड झाली.
            उपसरपंच शिल्पा आनंदा थोरवत यांनी आपल्या पदाचा आघाडी अंतर्गत ठरल्याप्रमाणे कालावधी संपल्यानंतर मागील महिन्यामध्ये राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. या उपसरपंच पदासाठी सारीका चौगुले यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. या निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सतिश चौगुले होते. ग्रामपंचायत सदस्य यासिन मुलाणी, संजय सावंत, अविनाश कांबळे,शिल्पा थोरवत, सुरेखा नलवडे, कमल भेंडेकर आदी उपस्थित होते.आघाडी नेते रावसाहेब चौगुले, पोलीस पाटील अमिर हजारी, माजी उपसरपंच सुरेश कांबरे, महादेव शिंदे,आनंदा थोरवत, सतिश वाकरेकर, अविनाश पाटील, सुनिल खारेपाटणे, बाळासो बारगीर, अमोल झांबरे, स्वनिल चौगुले,अमोल झांबरे, मधुकर अकिवाटे, कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments :

Post a Comment